Pankaja Munde | औरंगाबाद येथील सभेच्या बॅनरवर पंकजा मुंडे यांचा फोटो नसल्याने चर्चांना उधान

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) या गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. बीडमधील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या एका कार्यक्रमास पंकजा मुंडे अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यावरून भाजपवर (BJP) पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात होते. त्यानंतर आज औरंगाबाद येथे देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा फोटो नसल्याने चर्चांना उधान आले आहे.

नुकतच दिल्ली येथे झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडे देखील तेथे उपस्थित होत्या. पण आज देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर पंकजा मुंडे यांचा फोटो लावण्यातत आलेला नाही. पंकजा मुंडे या मराठवाड्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.

आजी-माजी नेत्यांचे फोटो या बॅनरवर दिसत असून पंकजा मुंडे यांच्या फोटोला वगळण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज (दि.२५) औरंगाबाद दौऱ्यावर असून यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून विभागीय कार्यालय परिसरात बॅनर लावण्यात आले आहेत. मात्र त्यावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा फोटो दिसत नसल्याने चर्चांना उधान आले आहे.

नुकतचं, भाजपचे बीडचे नेते जयदत्त क्षीरसागर (Jaydatt Kshirsagar) यांनी बीडमध्ये विविध विकासकामांच्या
उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित केले होते. यावेळी मात्र पंकजा मुंडे या
कार्यक्रमादरम्यान दिसल्या नाहीत. तसेच त्यांना या कार्यक्रमाचे कुठलेही निमंत्रण देण्यात आले नव्हते.
असे देखील बोलले जात आहे. पण बीडच्या राजकारणातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भाजपच्या अशा
मोठ्या नेत्याला दूर ठेवून आयात नेत्यांवर भाजप लक्ष देत असल्याच्या चर्चा बीडमध्ये चांगल्याच रंगू
लागल्या होत्या. त्यानंतर आज पंकजा मुंडे यांचा फोटो बॅनरवर दिसत नसल्याने याची देखील चर्चा
मराठवाड्याच्या राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.

Web Title :- Pankaja Munde | pankaja munde photo omitted from devendra fadnavis welcome banner in aurangabad