Pankaja Munde | ‘माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल’ – पंकजा मुंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकारचा (Shinde-Fadnavis Government) नुकताच मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) पार पडला. यामध्ये एकाही महिला आमदाराला (Female MLA) स्थान न दिल्याने शिंदे सरकारवर विरोधकांकडून टीका होत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यामुळे अनेकजण नाराज असल्याचे समोर आले आहे. यातच पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना स्थान मिळणार अशी चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात पंकजा मुंडे यांना स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.

 

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान का मिळाले नाही, यावर बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल. पंकजा मुंडे यांनी सूचक शब्दात दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. रक्षाबंधनाच्या निमित्ताने महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना पंकजा मुंडेंनी राखी बांधल्यानंतर (Raksha Bandhan) या दोघांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

यावेळी महादेव जानकर यांना मित्रपक्षांना मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी मित्रपक्षांनाच सल्ला दिला आहे.
मित्रपक्षांनी स्वत: ची लायकी वाढवायला हवी. त्यांचे आमदार-खासदार जास्त वाढले तर आपण मंत्रीपदाची मागणी करु शकता.
आता आपले किती आमदार आहेत या दृष्टीने आपण आत्मचिंतन करावं. माझे आमदार 20-25 होतील तेव्हा आम्ही पंकजा मुंडे,
देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आग्रह करु शकतो, असं जानकर म्हणाले.

 

काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

आम्ही दरवर्षी रक्षाबंधन साजरा करतो. आज रक्षाबंधनाचा दिवस आहे, म्हणून राजकीय बोलणार नाही.
सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. ओबीसीचे आरक्षण (OBC Reservation) पुन्हा मिळावे, अशी या सरकारकडून अपेक्षा आहे.
कदाचित माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिलं नसेल. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा मंत्रीपद देतील.
यावर माझं काहीच म्हणणं नाही.
दरम्यान संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मिळालेल्या मंत्रिपदावर बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ज्यांनी मंत्रिपद दिलंय त्यांना विचारा मी यावर काय बोलणार ?

 

Web Title : – Pankaja Munde | pankaja munde raksha bandhan mahadev jankar pankaja munde on cabinet expansion

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा