Pankaja Munde । एकनाथ खडसेंच्या ईडी चौकशीवरून भाजप नेत्या पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फडणवीस सरकार काळात महसूल मंत्री असताना एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी आणि जावई गिरीश चौधरी यांनी एक भूखंड घेतला होता. मात्र त्या भूखंडात खरेदी गैर व्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची सक्तवसुली संचालनालयाने (ED) गुरुवारी तब्बल 9 तास कसून चौकशी केली गेली. तर याप्रकरणी त्यांचे जावई चौधरींना अटक केली आहे. आणि त्यांना ED कडून सखोल चौकशी दरम्यान प्रश्न विचारलं असल्याचं समजते. या प्रकरणावरून भाजपकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप होत आहे. यावरून भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (BJP leader Pankaja Munde’s first reaction to the ED inquiry on Eknath Khadse)

Jyotiraditya Shinde । ज्योतिरादित्य शिंदेमुळेच प्रियंका चतुर्वेदीनी काँग्रेस पक्षाला दिली सोडचिट्ठी?; ‘या’ पुस्तकातून खुलासा

Pankaja Munde | pankaja munde spoke clearly about ed interrogation eknath khadse

माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, ‘ED, CBI आणि CID या मोठ्या तपास यंत्रणा आहेत, त्यांच्यावर मीडियामधून भाष्य करणं मला योग्य वाटत नाही. आपण त्या एजन्सीवर जेवढं कमी भाष्य करू, तेवढं त्यांच्याकडून न्याय होईल. त्यात कुणी चुकीचं असेल तर तसा न्याय होईल, कुणी बरोबर असेल त्याचाही न्याय होईल. आपण त्यास डिस्टर्ब करू नये. एकनाथ खडसेंवरील (Eknath Khadse) ED च्या कारवाईवर मी भाष्य करणं योग्य नाही, कारण मी त्यातील एक्सपर्ट नाही, असं स्पष्ट शब्दात पंकजा मुंडेंनी सांगितलं आहे.

Nana Patole | नितीन राऊत-बाळासाहेब थोरात सोनियांच्या भेटीसाठी दिल्लीत, नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे 5 वर्षांपूर्वी झालेल्या भूखंड खरेदी गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची सक्तवसुली संचालनालयाने (ED) खडसे यांची गुरुवारी तब्बल 9 तास कसून चौकशी केली. तर, सकाळी 11 ला हजर झालेले खडसे रात्री 8 वाजता ED कार्यालयातून बाहेर पडले. याप्रकरणी राज्यातील भाजपविरोधी पक्षांकडून सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप होत आहे.

Pune Crime News | 35 लाख रुपयांची फसवणूक ! प्राईड अमन असोसिएट्सचे भागीदार नवाज शेख, हसन पठाण व आमीनुद्दीन शेख यांच्यावर FIR

या दरम्यान, एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे व जावई चौधरी यांनी भोसरीतील 3.1 एकर भूखंड खरेदी केला. MIDC तील ही जमीन सरकारी असताना ती बाजार मूल्यापेक्षा कमी म्हणजे 3.1 कोटींना खरेदी केल्याचा आरोप खडसे कुटुंबीयांवर होत आहे. चार कथित कंपन्यांतून बेसकोम बिंट्कॉन कंपनीमार्फत वर्ग करण्यात आलेल्या रकमेबद्दलही त्यांच्याकडून माहिती घेण्यात आलीय. या कारवाईवरून भाजपवर टीका होताना दिसते. ही कारवाई राजकीय सुडापोटी होत आहे असा आरोप खडसेंनी (Eknath Khadse) भाजपवर लावला आहे.


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Pankaja Munde | pankaja munde spoke clearly about ed interrogation eknath khadse

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update