Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाइन – मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) देखील हरवू शकत नाहीत, असं वक्तव्य भाजप (BJP) नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमत्त सेवा पंधरवाड्याचे आयोजन बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी हे विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, कुणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ते जर त्यांच्याच पक्षाच्या सर्वोत्तम नेत्याच्या बाबतीत असं बोलत असतील तर मी काय बोलावं. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये (Assembly Elections) याबाबतीत काय झालं, काय नाही झालं जनता काय करु शकते हे माहिती आहे. पंकजा मुंडे यांनी ते वक्तव्य का केलं आपण त्यांना विचारावं. नरेंद्र मोदी यांच्याबाबत वक्तव्य का केलं, हे त्याच सांगू शकतील. त्या पक्षात नाराज आहेत की नाही त्याचं सांगतील, असं धनंजय मुंडे म्हणाले.

पंकजा मुंडे स्पष्ट आणि कार्यशील नेत्या

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Former Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी
पंकजा मुंडे (Pankaja Munde) या स्पष्ट आणि कार्यशील असलेल्या नेत्या आहेत.
त्यांनी त्यांच्या पक्षातील खदखद बोलून दाखवली.
स्वत:च्या बाळाला बाजूला ठेऊन दुसऱ्याच्या बाळाला मांडीवर बसवून त्याला गुटगुटीत करण्याचा जो प्रयत्न सुरु आहे,
त्याला पंकजा मुंडे यांनी चपराक लगावली असल्याचे पेडणेकर म्हणाल्या.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे म्हटलंय.
माझ्या भाषणाचा संपूर्ण व्हिडिओ पाहावा असं देखील आव्हान पंकजा मुंडे यांनी केले आहे.

Web Title :- Pankaja Munde | pankaja munde statement issue dhanajay munde comment said she knows reason of comment

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics Crisis | तारीख निश्चित, महाराष्ट्रातील शिंदे-ठाकरे वादावर ‘या’ तारखेला होणार सुनावणी

CM Eknath Shinde | ‘अनाथांचे नाथ एकनाथ, तुम्ही दयाळू आहात’, पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली ‘ही’ मागणी