‘पवार साहेब हॅट्स ऑफ’ ! पंकजा मुंडेंचा शरद पवारांना ‘सलाम’

मुंबई : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार यांची स्तुती केली आहे. पंकजा यांनी शरद पवार यांच्या कामाचा गौरव करताना आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मराठीत एक ट्विट केले आहे. पंकजा यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या कोरोनादरम्यान लागोपाठच्या दौर्‍यांबाबत सॅल्यूट केला आहे.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, शरद पवार साहेबांना हॅट्स ऑफ, कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत इतके दौरे. आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले…पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तरी कष्ट करणार्‍यांविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे.

25 ऑक्टोबरला पंकजा मुंडे यांनी एका रॅलीदरम्यान शेतकर्‍यांच्या मुद्द्यावर महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला होता. महाराष्ट्रात सरकारमध्ये शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्षसुद्धा एक घटकपक्ष आहे. पंकजा मुंडे यांनी रॅलीच्या दरम्यान म्हटले होते की, अतिवृष्टी पीडित शेतकर्‍यांसाठी उद्धव ठाकरे सरकारद्वारे घोषित केलेले 10,000 कोटी रूपयांचे पॅकेज सर्वांना दिलासा प्रदान करण्यासाठी पुरेसे नाही.

कापूस, सोयाबीन आणि धान्यसारखे पिक वर्षभरात पूर्णपणे नष्ट झाले, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या नुकसान भरपाईसाठी मोठे पॅकेज दिले पाहिजे होते.

ऊस लागवड हंगामात मजूर आणि साखर कारखाण्यांमधील वादाचा उल्लेख करत पंकजा म्हणाल्या की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रमुखांनी यावर तोडगा काढला पाहिजे.