पंकजा मुंडे यांनी भाजपशी ‘संबंध’ तोडला ? ट्विटरवरून BJP चा उल्लेख ‘गायब’, राजकीय वर्तुळात चर्चेला ‘उधाण’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी ग्रामविकास मंत्री राहिलेल्या पंकजा मुंडे यांना नुकत्याच झालेल्या विधानसभेत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांच्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपचे नाव गायब झाले आहे. पंकजा यांनी १ डिसेंबर रोजी पोस्ट करून आपण १२ डिसेंबर रोजी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यावेळी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पंकजा यांच्या ट्विटर अकाउंटवरून भाजपाचा उल्लेख गायब झाल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.

पंकजा मुंडे सध्या कोणत्याच सभागृहाच्या नेत्या नाहीत. त्यांच्याकडे पक्षाचे कोणते पद नाही. त्यामुळे नव्या वाटचालीसाठी पंकजा मुंडे काय नवीन निर्णय घेणार याकडे समस्त परळीकरांचेच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते ज्योतिरादित्त शिंदे यांनी देखील आपल्या ट्विटर अकाऊंटवरून असा उल्लेख काढला होता. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्च्यांना उधाण आले आहे.

या विधानसभेला परळीकरांनी राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांना पसंती दर्शवली होती. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भवाकडूनच पराभव सहन करावा लागला होता.

Visit : Policenama.com