पंकजा मुंडेंचा भाजपमधील लोकांनीच राजकीय ‘गेम’ केला, ‘या’ बड्या नेत्यानं सांगितलं

मुंबई, पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणाच्या आखाड्यात पक्ष बदलण्याचा प्रकार आज सर्रास घडत आहेत. पंकजा मुंडेंच्या एका फेसबूक पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले. पंकजा मुंडे 12 डिसेंबरला गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या दिवशी आपल्या समर्थकांशी संवाद साधून आपली पुढील राजकारणातील दिशा ठरवणार आहेत. त्यामुळे भाजपचेही लक्ष पंकजा मुंडेच्या भूमिकेकडे लागले आहे. याच कारणाने भाजपमध्ये अस्वस्थता दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपकडून गेम केला जात असल्याचे बोलले आहे.

विजय वडेट्टीवारांनी आरोप केला की भाजपच्या लोकांनी पंकजा मुंडे यांचा गेम केला आहे. ज्यांनी त्यांचा गेम केला त्यांच्यावर त्या नेम धरतील असा टोला देखील त्यांनी लगावला.

वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका करताना सांगितले की पंकजा मुंडे यांच्याशी विधानसभा निवडणुकीत राजकारण झाले. भाजपमध्ये काहीच गोलमाल नसता तर भाजपमधील दोन नेत्यांना असलेले पंकजा मुंडे कुठे जाणार नाहीत हे सांगण्याची वेळ आली नसती. बहुजनांना डावलू शकत नाही, सत्ता चालवू शकत नाही हे पंकजा मुंडे दाखवून देतील.

मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की मंत्रिमंडळ विस्तार कसा करायचा या सर्व अधिकार पक्ष श्रेष्ठीना आहे. पक्ष श्रेष्ठींकडे मंत्रिमंडळ विस्तारावर चर्च करण्यात येत आहे. येत्या दोन तीन दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार होईल.

चेतक महोत्सवात घोटाळा झाल्याबद्दल वडेट्टीवार म्हणाले की चेतक महोत्सवात मोठा घोटाळा झाला आहे. भाजप सरकार आपल्या मंत्र्यांना नेहमी क्लीन चिट देत आले. चेतक महोत्सव घोटाळ्यातील दोषींना शिक्षा व्हावी यासाठी आम्ही मागणी केली.

ट्विटरवरुन देखील हटवले भाजप –
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी फेसबुक पाठोपाठ ट्विटर वरुन देखील भाजप शब्द काढला आहे. सुरुवातीला त्यांच्या प्रोफइलचे यूजर नेम पंकजा मुंडे भाजप असं होतं. परंतू आता फक्त @Pankajamunde असं आहे. पंकजा मुंडे मोठा राजकीय निर्णय घेणार अशी चर्चा आहे. पंकजा मुंडे सध्या अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. विधानसभेत त्यांना दारुण पराभव झाला, त्यानंतर त्या शांत होत्या, परंतू त्यांच्या मनात काय आहे हे कोणालाही माहित नाही. परंतू आपल्या भावानांना त्यांनी फेसबूक पोस्टमधून वाट मोकळी करुन दिली.

Visit : Policenama.com