गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीनं पंकजांना व्यासपीठावरच अश्रू झाले अनावर

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरु केले होते. यावेळी पंकजा मुंडे व्यासपीठावरच भावूक झाल्याचे पहायला मिळालं. उपोषणस्थळी हजेरी लावत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यावर तोफ डागली. तसेच वेळप्रसंगी पंकजा यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला.

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या बॅनरखाली आज औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू आहे. याचे नेतृत्व पंकजा मुंडे या करीत आहेत. यावेळी पंकजा यांच्या सोबत त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे या देखील उपस्थित होत्या. तसेच विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर या लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले होते.

लाक्षणिक उपोषण सुरु असताना पंकजा मुंडे यांना आपल्या भावना अनावर झाल्या. दिवंगत नते आणि पंकजा यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांची आठवण आणि पक्षांतर्गत राजकारण अशा दोन्हीमुळे पकजांना अश्रू अनावर झाले. त्यावेळी व्यासपीठावरच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसून आले. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी यावळी सांगितले. तसेच उपोषणावरून आरोप करणाऱ्या खसादार इम्तियाज जलील यांना देखील त्यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले.