Pankaja Munde | ‘ठाकरे सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही’ ! पंकजा मुंडेंनी सांगितलं सत्ता कधी बदलणार

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारला (Maha Vikas Aghadi government) दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. तर दुसरीकडे भाजपचे नेते (BJP leaders) आघाडी सरकार पडण्याबाबत भाकित करत आहेत. आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारबद्दल भाकित केलं आहे. या सरकारचं भवितव्य चांगलं नाही, हे फार काळ टिकणार नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार असल्याचे पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात सत्ता बदलण्याचे संकेत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जाहीर भाषणातून दिले आहेत. बीड जिल्ह्यातील (Beed district) वडवणी येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

 

पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, महाविकास आघाडी सरकारचं भविष्य फार काही चांगलं नाही. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही. राज्यात सत्ता परिवर्तन होणार आहे. त्याची सुरुवात नगर पंचायत निवडणुकीच्या (Nagar Panchayat election) विजयापासून होईल. अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह नेत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. बऱ्याच दिवसानंतर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर ते आले आहेत. त्यामुळे बरं वाटतंय, असं म्हणत महाविकास आघाडीचे कबाड निघणार आहे, अशी टीका पंकजा मुंडे यांनी केली.

राष्ट्रवादीचे नेते (NCP) धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधताना पंकजा मुंडे म्हणाल्या,
सगळं माझ्याच गळ्यात आले पाहिजे. हे आमदार (MLA) आणि पालकमंत्री यांचं सुरु आहे.
याला जेलमध्ये घालू त्याला जेलमध्ये घालू सगळ्यांना जेलमध्ये घालणारा पालकमंत्री पाहिजे का?
कुणाचं घर बरबाद करायचं असं राजकारण मुंडे साहेबांनी शिकवलं नाही, असे म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.

 

धनंजय मुंडे यांचे ओबीसी आरक्षणावर (OBC reservation) कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही.
कोणत्या तोंडाने लोकांसमोर येतात. आरक्षण द्या नाहीतर नका देऊ आमची दुकानं चालली पाहिजे,
असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाटतं, असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

Web Title :- Pankaja Munde | thackeray government will change soon big statement of pankaja munde in beed

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Amit Shah | शिवरायांनी केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर देशाच्या दोन तृतीयांश भागावर राज्य केलं – अमित शाह

Blood Sugar | आवळा आणि कोरफडीच्या सेवनाने कमी होऊ शकते ब्लड शुगर, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Rupali Chakankar | ‘हे संस्कार… माफी मागा नाहीतर…’, रुपाली चाकणकरांचा गुलाबराव पाटलांना इशारा