भाजप नेत्या पंकजा मुंडेचे रोखठोक उत्तर, म्हणाल्या – ‘धनंजयच्या खासगी प्रकरणाचे समर्थन करणार नाही, पण…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कुटुंबामध्ये कोणते वाद झाले तर राजकारण केले नाही, राष्ट्रवादीचे नेते अन् राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या खासगी प्रकरणावेळी (second marriage case) तुम्ही मौन बाळगले असे का, असा प्रश्न नुकतेच भाजप नेत्या पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) विचारला होता. त्यावर मी मौन बाळगले नाही, असे उत्तर पंकजा यांनी दिले आहे. धनंजय आणि आम्ही एकाच परिवारातील आहोत. कोणाच्याही बाबतीत घडले असते तर मी अशीच वागले असते. राजकीय फायदा, नुकसान हे माझ्या निर्णयावर असेल, हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार असल्याचे उत्तर पंकजा मुंडे  यांनी धनंजय मुंडेंच्या दुसऱ्या लग्नाच्या (second marriage case) प्रकरणावर दिले आहे.

Pune : सोमवारपासून शहरातील दुकाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत खुली राहाणार; संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मात्र कडक संचारबंदी

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तीक जीवनात कधीही सार्वजनिक स्टेटमेंट करत नाही किंवा पाठीमागेही बोलत नाही.
हे माझे एक तत्व आहे.
धनंजय आणि आम्ही एकाच परिवारातील आहोत.
त्यांच्या परिवाराची हानी किंवा संकट असेल त्याचा राजकीय फायदा घ्यावा एवढी छोटी मी नाही. दुसऱ्याच्या अपयशावर त्याच्या अडचणींवर मला इमारत बांधायची नाही.
धनंजय मुंडेंच्या बाबतीत जे घडले त्यावर मी त्याचे समर्थन करू शकत नाही.
मी जेव्हा जन्मले तेव्हा मी पहिली स्त्री आहे हे निसर्गाकडून समजले, नंतर मी कोणाची मुलगी आहे, माझ्याकडे काय वारसा आहे ते कळले.
त्यामुळे मी माझे मत मांडले.
मी त्याचा राजकीय फायदा घेण्याचा उद्देश नसल्याचे पंकजांनी स्पष्ट केले आहे.

Advt.

महाराष्ट्राला विसरणार नाहीः पंकजा मुंडे
महाराष्ट्राला विसरून भविष्यात देशाच्या राजकारणात जाणार का या प्रश्नावर त्यांनी महाराष्ट्राला मी विसरणार नाही,
महाराष्ट्र माझी मातृभूमी आहे, कर्मभूमी आहे.
भविष्यकार नसल्याने मला पुढचे काही भाकित करता येत नसल्याचे पंकजा म्हणाल्या.

READ ALSO THIS :

 

तुमचा रंग सावळा आहे का ? याचे आरोग्यदायी फायदे जाणून व्हाल थक्क !

 

मराठा आरक्षण रद्द होण्यामागे ‘हे’ दोन प्रमुख कायदेशीर मुद्दे; जाणून घ्या