भाजपनं घेतला ‘हा’ निर्णय, पंकजा मुंडेंची नाराजी दूर ?

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नाराज झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी गोपीनाथ गडावर झालेल्या मेळ्यात स्पष्टपणे बोलून दाखवली होती. त्यांनी गोपीनाथ गडावरील कार्यक्रमामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निशाणा साधला होता.

राज्यातील सत्ता गेल्याने आणि नाराज नेत्यांमुळे दिल्लीतून आता सुत्र हालली आहेत. नाराजांना तुमच्या सर्वांची दखल घेण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. याचाच परिणाम म्हणून नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांच्यावर मराठवाड्यासाठी होणाऱ्या आंदोलनाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

मराठवाड्यातील पाणी प्रश्नासाठी येत्या 27 जानेवारीला पंकजा मुंडे औरंगाबादमधील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. हे उपोषण पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली.

भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी औरंगाबाद येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. यावेळी त्यांना भापवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे येणार आहेत का असे विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी हा मराठवाड्याचा प्रश्न आहे. तरी देखील त्यांना निमंत्रण देऊ ते नक्की येतील असा विश्वास बोराळकर यांनी व्यक्त केला.

फेसबुक पेज लाईक करा –