पंकजा मुंडेंनी केला देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा ‘गोप्यस्फोट’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज गोपीनाथ गडावरून पंकजा मुंडे नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र त्या आधी पंकजा मुंडे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एक गौप्यस्फोट केला आहे. भाजपच्या काही महत्वाच्या नेत्यांचे तिकीट हे दिल्लीतून कापण्यात आले नव्हते तर ते राज्यातील नेतृत्वांकडून देण्यात आले नव्हते असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रकांत बावनकुळे, प्रकाश मेहता अशा अनुभवी नेत्यांचे तिकीट कापले होते याबाबत बोलताना फडणवीस यांनी हा निर्णय दिल्लीतील नेतृत्वाचा आहे असे सांगितले होते मात्र फडणवीस यांच्या या विधानाला पंकजा मुंडे यांनी खोडून काढले आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी जो काही निकाल लागला त्यात पक्षाला जे यश मिळाले किंवा काही ठिकाणी अपयश मिळाले याची जबाबदारी स्वीकारायला पाहिजे असे देखील पंकजा मुंडे यांनी सांगिलते.

गोपीनाथ गडावर काय बोलणार पंकजा मुंडे ?
गोपीनाथ गडावर गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. यावेळी आपल्या पराभवाबाबत पंकजा खुलासा करतील आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त करतील.

तसेच यावेळी पंकजा मुंडे पुन्हा एकदा जोरदार शक्तिप्रदर्शन करतील असे सांगण्यात येत आहे. तसेच यावेळी भाजपवर नाराज असलेले एकनाथ खडसे हे देखील उपस्थित असणार आहेत. काही दिवसांपूर्वीच खडसे यांनी आज गोपीनाथ मुंडे असते तर माझ्यावर असा अन्याय झाला नसता असे सूचक विधान केले होते.

राज्यात भाजपवर अनेक नेते नाराज आहेत त्यामुळे पंकजा मुंडे यावेळी नेमकी काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष गोपीनाथ गडावर होणाऱ्या मेळाव्याकडे लागले आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/