पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा वादाच्या भोवऱ्यात

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

ऊसतोड मजुरांचा संप असतानादेखील काही ऊसतोड कामगार व वाहन चालक कारखान्यात जात होते. धारूर तालुक्यात मुकादम संघटनेने त्यांचा ट्रक आडवून तोडफोड केली. तसेच ट्रक मालकाला ८ हजार रुपयांचा दंडही केला. दोन दिवसापूर्वी ही घटना घडली होती. मात्र, या प्रकरणातील दंडाची पावती आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे. शिवाय दसरा मेळाव्याला गर्दी व्हावी यासाठी जाणीवपूर्वक संप लांबवला जात आहे. तसेच भाजप पदाधिकारी ऊसतोड कामगारांना सावरगावला दसरा मेळाव्याला येण्यासाठी दमदाटी करत आहेत, असा आरोप करत पंकजा मुंडे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1e189dc9-d02f-11e8-ab8f-9fdf40246eaa’]

१९९६ पासून दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी भगवान गडावर दसरा मेळाव्या घेण्यास सुरूवात केली होती. मात्र भगवान गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर गडावर दसरा मेळावा घेण्यास विरोध केला होता. यातून मंत्री पंकजा व शास्त्री यांच्यात मोठा संघर्ष झाला होता. गतवर्षीपासून पंकजा यांनी हा मेळावा पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथे भगवान बाबांच्या जन्म गावी सुरू केला आहे. आगामी काळातील लोकसभा निवडणुका डोळ्या समोर ठेऊन यावर्षी पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केलेली आहे. परंतु दोन दिवसापूर्वी धारूर तालुक्यात ऊसतोड कामगारांची ट्रक कारखान्यात जात असताना मुकादम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो आडवला. तसेच त्या ट्रकची तोडफोडदेखील केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ट्रकच्या तोडफोडीनंतर त्या ट्रक मालकाला ८ हजार रुपयांचा दंडदेखील केला. या घटनेनंतर दसरा मेळाव्या बाबत काही आरोप होत आहेत.

[amazon_link asins=’B07145W1YW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2f60bf50-d02f-11e8-a78a-5f96ed042b65′]

तसेच ती ८ हजार रुपयाची पावतीदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यासंदर्भात सूत्रांनी  दिलेल्या माहितीनुसार, जोपर्यंत सावरगावचा दसरा मेळावा होत नाही, तोवर कोयता हातात घ्यायचा नाही, असा दम मुकादम संघटनेतील काही पदाधिकारी ऊसतोड कामगारांना  देत आहेत. याबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी काही ऊसतोड मुकादम यांना विचारले असता. त्यांनी सांगितले की, संप सुरू आहे त्यामुळे दंड केला जाऊ शकतो. मात्र सावरगावच्या मेळाव्याचा व त्या दंडाच्या ८ हजार रुपयांच्या पावतीचा काही संबध नाही. मात्र, तरी पंकजा मुंडे यांचे विरोधक त्या ८ हजार रुपयांच्या पावतीचे भांडवल करत सावरगावच्या दसरा मेळाव्यावर सोशल मीडियावरून टिका केली जात आहे.

चार वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल ५५ जवान शहीद