…म्हणून पंकजा मुंडेंचा विधान परिषदेचा मार्ग खडतर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना परळी विधानसभा पतदारसंघातून मात दिली. त्यांचा पराभव झाला तरी त्यानंतर मात्र विधान परिषदेची चर्चा सुरु झाली होती.

परंतु राज्यातील समीकरणं बदलल्यामुळे आता मात्र भाजपची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे आता भाजपला विधान परिषद निवडणूक जड जाणार असे दिसत आहे. कारण राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची महाविकासआघाडी तयार झाली आहे. त्यामुळे आता पंकजांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

परळीतील पराभवानंतर पंकजांना विधान परिषदेवर पाठवण्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. महाविकासआघाडीच्या निर्मितीमुळे आणि त्यांच्या ताकदीमुळे पंकजांचा विधान परिषदेचा मार्ग खडतर होणार हे मात्र नक्की.

महाविकासआघाडीच्या निर्मितीमुळे तिन्ही पक्षांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतही भाजपला मोठा धक्का बसणार आहे. महाविकासआघाडीमुळे विधान परिषदेच्या जागांवरीही त्याचा परिणाम होणार आहे. राज्यपाल नियुक्त आणि विधानसभेवर निवडून येणाऱ्या सदस्यांची मते कमी होणार आहेत.

2020 मध्ये राज्यपाल नियुक्त 12, आमदारांद्वारे निवडल्या जाणाऱ्या 9 आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडलेल्या 5 सदस्यांचा असा एकूण 26 सदस्यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. भाजप-सेनेची युती असती तर 26 पैकी किमान 13 जागा भाजपला मिळाल्या असत्या. आता जागा मिळवण्यासाठी मात्र भाजपला मोठा संघर्ष करावा लागणार असे दिसत आहे.

Visit : Policenama.com