पुणेकर प्रियंका जोशीचा अटकेपार झेंडा

पुणे :पोलिसनामा ऑनलाईन

फक्त पुणेकरांनाच काय तर आख्या देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी पुणेकर प्रियांका जोशी यांनी करून दाखवली आहे. प्रियांका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बायोइन्फॉरमॅटिक्स व बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या माजी विद्यार्थिनी आहे. त्यांच्या कामगिरीची दाखल घेत त्यांचा सामावेश ‘व्होग’ या जगप्रसिद्ध मासिकाने ब्रिटनमधील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीमध्ये करण्यात आला आहे.

तर फोर्ब्स या नावाजलेल्या जगप्रसिद्ध नियतकालिकेने प्रियंकाचा समावेश “अंडर ३०, सायन्स अँड हेल्थ केअर मध्ये केला आहे. यात विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या ३० वर्षांखालील तरुणांचा समावेश करण्यात येतो आत यात प्रियंकाने देखील आपला ठसा उमटवला आहे. प्रियंकाने केल्या संशोधनात्मक कार्याचा गौरव यानिमित्ताने करण्यात आला आहे. प्रियंकाने सावित्रीबाई फुले विद्यापीठामधून पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर केंब्रिज विद्यापीठामध्ये संशोधन करण्यास सुरुवात केली होती.

प्रियंका यांनी मानवी मेंदूच्या संदर्भात संशोधन केले आहे. जेव्हा फोर्ब्स मासिकाने प्रियांकाचा समावेश करून गौरव केला तेव्हा त्यांनी नुकतीच पीएचडी पूर्ण केली होती. त्या सध्या केंब्रिज विद्यापीठामध्ये रिसर्च फ़ेलो म्हणून कार्यरत असलेल्या प्रियंकाने अल्झायमर्स आजारावरील संशोधनामध्ये आघाडी घेतली आहे. मेंदुविषयक आजारांसंदर्भात प्रियंकाने तयार केलेली ’मॉलिक्यूल लायब्ररी’ हे असामान्य संशोधन म्हणून वाखाणण्यात आले आहे. ’डिमेंशिया’मुळे इंग्लंड व वेल्समधील महिलांच्या होणाऱ्या मुत्युंचे प्रमाण वाढत असताना प्रियंकाचे हे संशोधन अत्यंत महत्त्वपूर्ण आहे,” अशा शब्दांत ‘बायोकेमिस्ट’ प्रियंकास व्होगने गौरविले आहे.

व्होगने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जुलैतील अंकासाठीच्या मुखपृष्ठावर प्रियंका यांना मानाचे स्थान देण्यात आले आहे. व्होगने या यादीत हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध कादंबरीमालिकेच्या लेखिका जेके रोलिंग यांनाही स्थान दिले आहे.