भ्रष्टाचाराच्या आरोपावर पंकजा मुंडे म्हणतात … 

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी घेतलेले निर्णय कसे भष्टाचारी आहेत असे सांगण्याचा प्रयत्न गेली चार वर्ष एकच माणूस करत आहे.  म्हणून प्रत्येक वेळी केलेल्या आरोपांना उत्तर देणे मला योग्य वाटत नाही असे पंकजा मुंडे यांनी म्हणाले आहेत.

माझ्यावर झालेल्या भष्टाचाराच्या आरोपाचा माझ्या विभागाने खुलासा केला आहे म्हणून मला उत्तर देणे उचित वाटत नाही असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हणले आहे.

दरम्यान राज्यातील ८५ हजार अंगणवाडी केंद्रावर सेविकांना देण्यात येणाऱ्या स्मार्टफोन मोबाईल खरेदीत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे १०६ कोटी रुपयांचा भष्टाचार केला आहे असा धनंजय मुंडे यांनी आरोप केला आहे. गेली चार वर्ष एकच माणूस माझ्यावर भष्टाचाराचे आरोप करत आहे. असे म्हणून पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे आरोप साफ खोटे असल्याचेच एक प्रकारे म्हणले आहे. या आधीहि अंगणवाडीच्या चिक्की वाटपासाठी खरेदी करण्याच्या प्रकरणात भ्रष्टाचार झाला असल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर भष्टाचाराचे आरोप केले होते.