नगरसेवकाच्या मुलाची ‘दबंग’गिरी, युवकाच्या डोक्यात फोडल्या दारूच्या बाटल्या

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – पनवेलचे नगरसेवक जगदीश गायकवाड यांच्या तीन मुलांनी आणि भाच्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले आहे. गंभीर जखमी झालेल्या या तरुणाला दवाखाण्यात भरती केले असून त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्याच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले जात आहे. विश्वनाथ गायकवाड असे या गंभीर जखमी आलेल्या तरुणाचे नाव आहे.

हे आहे कारण

काल ५ ऑगस्ट रोजी पनवेलमधील गिरीराज रेस्टॉरंट अँड बारसमोर रात्री साडेअकरा वाजता हि घटना घडली. हल्ल्याचे कारण असे समोर येत आहे कि, या नगरसेवकाच्या मुलाने आणि भाच्याने विश्वनाथच्या भावाला दोन दिवसांपूर्वी मारहाण केली होती. त्याने या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यामुळे याचा राग मनात धरून या चौघांनी त्याचा भाऊ विश्वनाथवर हल्ला चढविला. आम्ही नगरसेवकाची मुले असून आमच्याविरोधात कोण तक्रार दाखल करू शकतो? असं म्हणत ते सिद्धार्थचा शोध घरत होते. मात्र तो न सापडल्याने त्यांनी त्याच्या भावाला प्रचंड मारहाण केली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतला असून या फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. मात्र या अशा गुंडगिरीमुळे कायदा आणि सुव्यवस्था राहिली आहे कि नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –