Panvel Crime | फार्म हाऊस जवळ ऑडी गाडीत आढळलेला मृतदेह तळेगाव दाभाडे येथील गुन्हेगाराचा, दोन दिवस मृतदेह गाडीत पडून

पनवेल : पोलीसनामा ऑनलाइन – Panvel Crime | मुंबई-गोवा हायवेलगत (Mumbai-Goa Highway) नारायण राणे (Narayan Rane) यांच्या फार्म हाऊसच्या बाजूला एका लाल रंगाच्या ऑडी गाडीत (Audi car) मृतदेह आढळला होता. महामार्गावरील कर्नाळा खिंड येथे शुक्रवारी (दि.18) हा मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील (Panvel Taluka Police Station) पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी (Forensic Investigation) पाठवला. हा मृतदेह पुण्यातील (Pune) तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथील संजय कार्ले (Sanjay Karle) याचा असल्याचे सांगितले जात आहे. संजय याच्यावर सोन्याची बनावट नाणी (Fake Gold Coins) विकून फसवणूक (Fraud) केल्याचे अनेक गुन्हे दाखल (Panvel Crime) असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पनवेल-पेण रोडवर (Panvel Crime) असलेला तारा गावच्या हद्दीत काल रात्री एका लाल रंगाच्या ऑडीच्या (Audi Car) मागील बाजूस एक मृतदेह आढळून आला होता. गाडी क्रमांक MH-14 GA 9585 ही गाडी कागदोपत्री पुणे जिल्ह्यातील तेजस प्रकाश साळवे (Tejas Prakash Salve) यांच्या मालकीची दिसत आहे. याबाबतचे वृत्त एका वृत्तवाहीनीने दिले आहे.

ऑडी कार तारा गावच्या हद्दीतील एका फार्म हाऊसच्या समोर दोन दिवसांपासून उभी होती. या कारमध्ये एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. मयत व्यक्तीने टी-शर्ट, जीन्स पॅन्ट घातली आहे. पायात स्पोर्ट्स शूज दिसत होते. बंद गाडीत मागच्या सीटखाली मृतदेह कोंबलेल्या अवस्थेत आढळून आला होता.

हा मृतदेह तळेगाव दाभाडे येथील संजय कार्ले याचा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्याच्यावर फसवणुकीचे अनेक गुन्हे (FIR) दाखल असून त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई
(MCOCA Action) Mokka करण्यात आली होती. तो पोलिसांच्या अटकेत होता.
सहा महिन्यापूर्वीच पॅरोलवर बाहेर आला होता.

Web Title :-  Panvel Crime | sanjay karle dead body found in mumbai goa highway in maharashtra

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Gulabrao Patil | माझ्याकडे अनेकांची अनेक लफडी आहेत, ती मला बाहेर काढालया लावू नका – गुलाबराव पाटील

Chandrakant Khaire | चंद्रकांत खैरे भाषणाला उभे राहिले आणि लोकांनी खुर्च्या सोडल्या