‘पावली डॅम’नं अनेक सिनमात दिलेत ‘न्यूड’ सीन्स, ‘बोल्ड’ व्हिडीओंमुळे सोशलवर ‘खळबळ’

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार पावली डॅम हिनं अनेक सिनेमात काम केलं असून एक बोल्ड अ‍ॅक्ट्रेस म्हणून ती ओळखली जाते. हेट स्टोरी या पहिल्या सिनेमात तिनं अनेक बोल्ड सीन्स दिले आहेत. पहिल्याच सिनेमातून ती खूप चर्चेत आली. याआधी तिनं अनेक बंगाली सिनेमात काम केलं आहे. परंतु हेट स्टोरी मधील आपल्या न्यूड सीन्सनं तिनं सर्वांनाच हैराण केलं. तिनं सिद्ध केलं की, बोल्डनेसच्या बाबतीत तीही काही कमी नाही.

पावलीचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला आहे. ती 39 वर्षांची आहे. परंतु तिचा हॉटनेस पाहून तिच्या वयाचा अंदाज येत नाही. पावलीनं बॉलिवूडमध्ये मोजक्याच सिनेमात काम केलं आहे. परंतु बंगाली इंडस्ट्रीतील ती टॉपची अ‍ॅक्ट्रेस आहे.

पावलीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर जिबोन नीयेहेला या बंगाली टीव्ही शोमधून तिनं आपल्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर तिनं तीथिर, अतीथी, सोनार, हरिन यांसारख्या अनेक शोमध्ये काम केलं आहे. टीन यारी कथा हा बंगाली सिनेमा तिचा पहिला बंगाली सिनेमा आहे. 2004 साली सुरू झालेला हा सिनेमा 2012 पर्यंत रिलीज होऊ शकला नाही. नोटोकर मोतो, सांझ, बाती, कालबेला, लार चार अध्याय, हाल्का, माछेर, झोल, पारापार, छाया मानुष, थाना थेके आशछी, मानेर मानुष, इनकंपलीट, बेटरूम यांसारख्या अनेक बंगाली सिनेमात तिनं काम केलं आहे.

बॉलिवूडमधील पावलीच्या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर 2012 साली आलेल्या हेट स्टोरी आणि 2013 साली आलेल्या अंकुर अरोरा मर्डर केस यांसारख्या सनेमात तिनं काम केलं आहे.