पप्पांनी सांगितलंय ! करीनाला ‘या’ नावानं कधीच हाक मारू नकोस, सारानं केली सैफ अली खानची ‘पोलखोल’

पोलीसनामा ऑनलाईन : बॉलिवूड स्टार सारा अली खान आपल्या बिंधास्त वक्तव्य ओळखली जाते. तिनं वडिल सैफ अली खानची दुसरी पत्नी करीना कपू यांच्या नात्यावरही अनेकदा बिंधास्त वक्तव्य केलं आहे. आपल्या नात्यांवर अनेकदा ती आपलं मत मांडत असते. सारा सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी आहे.

आआधीही सारानं कॉफी विद करणमध्ये मोठा खुलासा केला होता. करणनं तिला विचारलं होतं की, ती करीनाला काय म्हणून हाक मारते. त्यावेळी सारानं याचंही उत्तर दिलं होतं. तिनं सांगितलं की, तिलाही हाच प्रश्न पडला होती की, करीनाला आंटी बोलवू की आई. तेव्हा सैफनं असं करण्यास स्पष्ट मनाई केली होती. सैफनं साराला स्पष्ट सांगितलं होतं की, करीनाला कधीच आंटी म्हणून हाक मारू नकोस असं सैफ म्हणाला होता. करीनाला आंटी म्हटलेलं कधीच आवडणार नाही.

सारनं सांगितलं की, तिनं नंतर करीनासोबत यावर चर्चा केली होती. तेव्हा करीनानं तिला समजावलं की, आपण मैत्रिणी प्रमाणं रहायला पाहिजे. त्यामुळं आम्ही तसंच राहतो. आई अमृता सिहं सैफ पासून वेगळं झाली आहे. यावरही सारानं भाष्य केलं होतं. ती म्हणाली होती की, उलट आता आमच्याकडे दोन घरं आहेत.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like