पपई खाल्ली तर वेगानं कमी होईल वजन, असं करा सेवन, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेक पद्धती अवलंबल्या असतील. कधी जिममध्ये गेला असाल, तर कधी डाएट चार्ट फॉलो केला असाल. कधीकधी या पद्धती प्रभावी ठरतात, तर कधीकधी एक इंच देखील वजन कमी होत नाही. अशात लोक हार मानून वजन कमी करण्यासाठीच्या सर्व उपायांचे प्रयत्न करणे सोडून देतात. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर आजपासूनच पपई खाण्यास सुरवात करा. यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागणार नाहीत.

आपल्या वजन कमी करण्याच्या आहारामध्ये पपई समाविष्ट करू शकता. जर तुमचा लठ्ठपणा नियंत्रणात ठेवायचा असेल, तर पपईचे सॅलड खा, पपईचा रस प्या. पिकलेली पपई आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी असते. ती खाल्ल्याने बरेच आजार टाळू शकतो. ती वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. तुम्ही खालील प्रकारे पपई खाण्यास सुरवात करा, ज्याने वजन कमी होण्यास सुरुवात होईल.

पपईमधील पौष्टिक घटक
यात अनेक पौष्टिक घटक असतात. पपईत कॅलरीज आणि फॅट कमी असतात. अशात कितीही खाल्ले तरी लठ्ठपणा वाढत नाही. हे कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टम दुरुस्त करते. पपई हे पोटाच्या आरोग्यासाठी खूप आरोग्यदायी आहे. पचनशक्ती सुधारते. कर्करोग होण्याचा धोका कमी करते. वाढत्या वजनामुळे त्रस्त असाल तर कच्ची पपई खा. पिकलेल्या पपईपेक्षा त्यात जास्त सक्रिय एंझाइम असतात, जे चरबी कमी करण्यास उपयुक्त आहे.

न्याहारीत असे करा पपईचे सेवन
ताजी पपई घ्या आणि तीच खा. दिवसाची सुरुवात लिंबू पाण्याने करा. यानंतर पपईचे सॅलड खा. तुम्हाला मध्यम आकाराची पपई खावी लागेल.

लंचमध्ये पपई
दुपारच्या जेवनात तुम्हाला सॅलड खावे लागेल. त्यात चिरलेला टोमॅटो, पालक, थोडासा ऑलिव्ह, २ लसूण पाकळ्या आणि अर्ध्या लिंबाचा रस घाला. सॅलड खाल्यावर पपईचा रस प्या. दुसर्‍या लंच वेळी वांग्याबरोबर पालक घालून सॅलड तयार करू शकता. त्यात थोडे बीट आणि ऑलिव्ह तेल घाला. ते खाल्ल्यानंतर पपईचा रस प्या.

स्नॅकमध्ये पपईचा ज्यूस प्या
संध्याकाळी भूक लागल्यावर अर्ध्या पपईचा रस तयार करा आणि अननसाच्या दोन स्लाइस खा.

रात्रीच्या जेवणात पपईचे सॅलड
रात्रीच्या जेवणात व्हेजिटेबल सूप घेऊ शकता, ज्यात कांदा, धणे आणि लिंबू घाला. त्यानंतर कापलेली पपई खा. दुसर्‍या दिवशी रात्रीच्या जेवनात व्हेज सॅलडसह थोडी कापलेली पपई खा. काही महिन्यांसाठी हा डाएट चार्ट फॉलो करून पाहा, वजन निश्चितच नियंत्रणात येईल.