मांसाहार केल्यानंतर पपई खाल्ल्यास होतील ‘हे’ मोठे फायदे ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   पपईचे आरोग्याला होणारे फायदे सर्वांनाच माहित आहेत. कच्चा पपईप्रमाणे पिकलेल्या पपईचे देखील खूप फायदे होतात. पपईत प्रथिनं, खनिजं, जीवनसत्व अ आणि क भरपूर प्रमाणात असतात. पपई पिकते तसं त्यातील क जीवनसत्व वाढतं. अनेकदा जेवणानंतर पपई खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु मांसाहार केल्यानंतरही पपई खाल्ल्यानं अनेक फायदे होतात. आज याच बद्दल आपण माहिती घेणार आहोत.

1) मांस पचायला जड असतं. पपईचं सेवन केलं तर पचनशक्ती वाढते. त्यामुळं मांसाहार केल्यानंतर पपई खावी.

2) भूक मंदावली असेल तर कच्च्या पपईची भाजी खावी. यामुळंही पचनास फायदा मिळतो.

3) पपईमधील पेपेन मुळं अपचन, आम्लपित्त, बद्धकोष्ठता हे पोटाचे विकार दूर होतात.

4) पिकलेल्या पपईत फळशर्करा असते, जी रक्तात लगेच शोषली जाते. यामुळं ऊर्जा आणि उत्साह यात वाढत होते.

5) सौंदर्य वाढवण्यासाठीही पपईचा खूप फायदा होतो.

6) कच्च्या पपईचा रस जर चेहऱ्यावर लावला तर तेज येतं. पुटकुळ्या, मुरूम, सुरकुत्या नाहीशा होतात.

7) त्वचा कोरडी आणि सुरकुतलेली असेल किंवा उन्हामुळं त्वचेवर पुटकुळ्या आल्या असतील आणि त्वचेची आग होत असेल तर पपईचा रस त्वचेवर लावावा. यामुळं दाह नाहीसा होतो आणि त्वचा नितळ होते.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.