Papaya Seeds | पोटातील जंत मारण्यासाठी पपईच्या बिया खाताहेत लोक, तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Papaya Seeds | अमेरिकेत सध्या पोटातील जंत मारण्यासाठी एक नवीन ट्रेंड सुरू आहे. सोशल मीडियावर लोक पोटातील जंत मारण्यासाठी पपई खाण्याचा सल्ला एकमेकांना देत आहेत. काही लोक व्हिडिओ बनवून लोकांना आपला अनुभव सांगत आहेत. परंतु खरोखरच पपईचे बी (Papaya Seeds) पोटातील जंत मारण्याचे काम करते का?

टोक्सोकेरियासिस, पिनवॉर्म आणि एक्सारियासिस सारखे राऊंडवॉर्म म्हणजे पोटातील जंत आतड्यात होतात. हे जंत आठवड्यापासून दोन वर्षापर्यंत शरीरात जिंवत राहू शकतात आणि संसर्ग पसरवू शकतात. घाणीमुळे ते हाताद्वारे पोटापर्यंत सहज पोहचतात.

याशिवाय खराब खाणे, घाणेरडे पाणी आणि अर्धवट शिजलेले अन्न खाल्ल्याने सुद्धा पोटात जंत होतात. अशावेळी पपईचे बी जंतावर नैसर्गिक उपचार मानला जातो. यावर पूर्वीसुद्धा अनेक संशोधन झाली आहेत.

2007 मध्ये नायजेरियाच्या 60 मुलांवर झालेल्या एका संशोधनातून समजले की, पपईचे बी खुप प्रभावी आहे. संशोधनानुसार बी खाणार्‍या 71 टक्के मुलांच्या पोटातून जंत शौचावाटे बाहेर पडले.

मात्र, अमेरिकेच्या क्लिवलँड क्लिनिकच्या एमडी क्रिस्टीन ली यांचे म्हणणे आहे की,
कमी लोकांवर करण्यात आलेल्या अशा संशोधनावर विश्वास ठेवता येणार नाही.
यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांवर ट्रायल करण्याची आवश्यकता आहे.
कारण जास्त प्रमाणात पपईचे बी खाणे चिंतेचा विषय आहे.

डॉक्टर ली म्हणतात, पपईच्या बीमध्ये काहीप्रमाणात सायनाईड असते.
हे एक हानिकारक नैसर्गिक केमिकल आहे आणि जास्त प्रमाणात खाल्ल्याने खुप नुकसान होऊ शकते.
पोटात जंत झाले असतील तर सोशल मीडियावर उपाय शोधण्यापेक्षा डॉक्टरांकडे जा.

Web Titel :- Papaya Seeds | papaya seeds intestinal parasites food

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMC Parking | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अभिजित बारवकर यांच्या मागणीला यश ! महापालिका गणेशोत्सवासाठी मंडईतील वाहनतळ उद्यापासून सुरू करणार

Maharashtra Cabinet Decision | मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय ! चक्रीवादळाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी कोकणाला 3 हजार कोटी

Dizo Smartwatch | ‘डीझो’ने भारतात लाँच केल्या 2 बेस्ट स्मार्टवॉच; काय आहे किंमत? जाणून घ्या