जिजामाता प्राथमिक शाळेत कागदी पतंग बनवणे कार्यशाळा संपन्न

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षण सहायक मंडळ संचलित जिजामाता प्राथमिक शाळेत दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत कागदी पतंग बनविणे कार्यशाळा घेण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापक अनिस काझी यांनी प्लास्टिकचा वापर टाळावा, पतंगाला मांजा ऐवजी साध्या दोऱ्याचा वापर करावा या विषयी माहिती दिली. उप शिक्षक राजाराम जाधव यांनी मकरसंक्रांतीची माहिती सांगितली. हिवाळ्यात स्निग्ध पदार्थांची शरिराला गरज असते म्हणुन तीळ, गुळ, गाजर, हरभरे, ऊस, बोरे यांना फार महत्व आहे. सूर्याचे मकर राशीत संक्रमन होते. तिळगुळ घ्या गोडगोड बोला. हा संदेश देण्यात आला. मुलांनी पतंगासाठी दैनिक वृत्तपत्राचा कागद, कॅलेंडरचा कागद, झाडूच्या काड्या वापरून लहान मोठे विविध आकारात पतंग बनवण्याचा आनंद घेतला. सुरुवातीला वर्गशिक्षकांनी पतंग बनवण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. शेवटी विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, संचालक शंतनु पाटील, पं.सं.सदस्या रंजना पाटील, संचालिका नीता पाटील व सर्व संचालक मंडळ व संस्थेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी वैष्णवीताई यांनी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलास भामरे, सुहास बच्छाव, दिलीप शिरसाठ, समीर देवडे, राजाराम जाधव, केदुबाई गवळी योगिराज महाले, हर्षदा बच्छाव, बद्रीप्रसाद वाबळे बाळासाहेब वाजे, अहिल्यादेवी बालकमंदिर शिक्षिका किशोरी करपे, विद्या राऊत यांनी परिश्रम घेतले.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/