Pune News : कुख्यात गजानन मारणे आणि 15 जणांची पप्पू गावडेच्या खुनाच्या गुन्ह्यातून मोक्का न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कूविख्यात गुन्हेगार गजानन मारणे व त्याच्या 15 साथीदारांची गाजलेल्या पप्पू गावडे खून प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. विशेष मोक्का न्यायाधीश ए. वाय. थत्ते यांनी हा निर्णय दिला आहे. काही दिवसांपूर्वी अमोल बधे खून प्रकरणातून सुटका झाली आहे. त्यामुळे आता गजा मारणे याचा कारागृहातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

गजनान उर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय 44, हमराज चौक, शास्त्रीनगर कोथरुड), रुपेश कृष्णराव मारणे, पपू उर्फ अतुल लक्ष्मण कुडले (वय 30), संतोष विश्वनाथ शेलार, सुनील नामदेव बनसोडे, सागर कल्याण राजपूत, गणेश नामदेव हुंडारे, प्रदीप दत्तात्रय कंधारे, अनंता ज्ञानोबा कदम, बाब्या उर्फ श्रीकांत संभाजी पवार, बापू श्रीमंत बागल, गोरक्षनाथ तुकाराम हाळदे, यशवंत उर्फ बाळा दासू बोकेफोडे व उमेश नागु टेमघरे अशी निर्देश मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पौड पोलीस ठाण्यात निलेश जाधव यांनी फिर्याद दिली होती.

दोन टोळ्यांच्या वर्चस्व वादातून गजा मारणे टोळीने नोव्हेंबर 2014 मध्ये मध्यरात्री पप्पू गावडे याचा लवळे येथे खून केला होता. निर्घृण हत्या केली होती. यानंतर शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. दरम्यान याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी मोक्कानुसार कारवाई केली होती. या गुन्हयाची सुनावणी मोक्का न्यायालयात सुरू होती. आज न्यायालयाने निकाल दिला असून, याप्रकरणात गजा मारणे व त्याच्या इतर 13 साथीदारांची निर्दोष मुक्तता केली आहे. पुरव्या अभावी आरोपींची सुटका केल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे.

याप्रकरणात आरोपीकडून ऍड. सुधीर शहा, ऍड. विजयसिंह ठोंबरे, ऍड. विपुल धुशिंग, ऍड. जितू सावंत, ऍड. विद्याधर कोशे, ऍड. भरेकर यांनी काम पाहिले आहे.