पप्पू कलानी यांच्या पत्नी माजी आमदार व माजी महापौर ज्योती कलानी यांचे निधन

उल्हासनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सुरेश (पप्पू) कलानी यांच्या पत्नी तसेच उल्हासनगर शहराच्या माजी आमदार आणि माजी महापौर ज्योती कलानी यांचा आज (रविवार) ह्दयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. त्या 67 वर्षांच्या होत्या काही वेळांपुर्वी ही माहिती समोर आली आहे. ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांची प्राणज्योत मालवली.

उल्हासनगर महापालिकेत नगरसेवक पदापासून राजकीय प्रवासाला त्यांनी सुरूवात केली होती. त्यानंतर त्या स्थायी समितीच्या सभापती, महापौर आणि आमदार देखील झाल्या होत्या. मात्र, गत विधानसभा निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.