नक्षली हल्ले रोखण्यासाठी पॅरा मिलिटरी फोर्स : लष्कर प्रमुख बिपिन रावत

कोल्हापूर  : पोलीसनामा ऑनलाईन – छत्तीसगड इथं झालेल्या नक्षली हल्ल्यात पोलिसांनसह एका कॅमेरामनचा मृत्यू झाला. आता नक्षली हे वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले करत आहेत. नक्षली फट्रेड झाल्याने कॅमेरामन वर हल्ला केला असून या नक्षलीना रोखण्यासाठी पॅरा मिलिटरी फोर्स तैनात करण्यात आल्या असल्याचं भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सांगितलं आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत हे मराठा बटालियनच्या एका कार्यक्रमासाठी कोल्हापुरात आले होते. यावेळी रावत यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रावत यांनी काल छत्तीसगड इथं झालेल्या नक्षली हल्ल्यात २ पोलीस आणि एका कॅमेरामन चा मृत्यू झाला असल्याचं सांगितलं तसंच नक्षली हे वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले करत आहेत. नक्षली फट्रेड झाल्यानेच कॅमेरामन वर हल्ला केला असून या नक्षलीना रोखण्यासाठी पोलिसांच्या सोबत पॅरा मिलिटरी फोर्स त्या भागात तैनात करण्यात आल्या असल्याचं रावत यांनी सांगितलं.
जम्मू-काश्मीर परिसरात होणारे दहशतवादी हल्ले होत आहेत. दहशतवादी हे प्रत्येक वेळी हल्ल्याची पद्धत बदलत आहेत. सध्या दहशतवादी हे स्नायफर रायफल वापरात असल्याचा आम्हाला संशय आहे. तर आपल्याकडे AK 47 पद्धतीच्या रायफल असल्याचं त्यांनी सांगितलं.
 कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी हे गाव देशासाठी आदर्शवत आहे. या गावातील प्रत्येक घरातील एक व्यक्ती ही आर्मी मध्ये आहे. त्यामुळं या गावाचा देशसेवेत मोठा वाटा असल्याने गावकऱ्यांचे कौतुक रावत यांनी केलं आहे.