मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकते ‘पॅरासिटामोल’, क्रोनिक पेनमध्ये न देण्याचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पॅरासिटामोल, इबुप्रोफेन आणि अ‍ॅस्पिरिन सारखी वेदना औषधे क्रोनिक पेन (अनेक आठवड्यापर्यंत शरीरात होणाऱ्या वेदना) च्या स्थितीत फायद्यापेक्षा अधिक नुकसान पोहोचवू शकतात. यूके सरकारच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. यूकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्सने (NICE) ने एक नवीन मार्गदर्शक तत्त्व तयार केले आहे आणि डॉक्टरांनी आवाहन केले आहे की, हे औषध तीव्र वेदना असलेल्या रूग्णांना देऊ नये. एनआयसीइचे म्हणणे आहे की, या औषधांमुळे रुग्णाची तब्येत सुधारते किंवा वेदना किंवा मानसिक अस्वस्थता कमी होते, याबद्दल फार कमी पुरावे मिळाले आहेत. परंतु या औषधांमुळे हानी पोचू शकते असा पुरावा नक्कीच आहे, ज्यामुळे रुग्णांना याची लत लागते.

ब्रिटनची एक तृतीयांश ते आर्धी लोकसंख्या क्रोनिक पेनने ग्रस्त असल्याचे मूल्यांकन केले गेले आहे. या लोकांतील अर्धे लोक नैराश्याला बळी पडले आहेत आणि त्यापैकी दोन तृतीयांश यामुळे काम करण्यास असमर्थ आहेत. मार्गदर्शकतत्त्वामध्ये म्हटले आहे की, प्रामुख्याने क्रोनिक पेनने ग्रस्त असलेल्या लोकांना काही अँटीडिप्रेसस दिली जाऊ शकते. मसुद्याच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये लिहिले आहे की अ‍ॅस्पिरिन, इबुप्रोफेन, बेंझोडायजेपाइन किंवा ओपिओइड्स सारख्या पॅरासिटामॉलची औषधे रूग्णांना दिली जाऊ नये, कारण यामुळे मदत मिळाल्याचा कोणताही पुरावा नाही.

एनआयसीई सेंटर फॉर गाईडलाईनचे संचालक पॉल क्रिस्प म्हणतात की, क्रोनिक पेन एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर काय परिणाम करते हे प्रथम समजून घेणे आवश्यक आहे. याच्या आधारे, एक चांगली काळजी योजना ठरविली जाऊ शकते. त्याच वेळी, ड्राफ्ट गाईडलाईनमध्ये असेही म्हटले आहे की, या विषयावर अधिक संशोधन आवश्यक आहे, जेणेकरून इतर संभाव्य उपचारांचा शोध घेता येईल. यापूर्वी, यूकेचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक म्हणाले आहेत की, डॉक्टरांकडून वेदना औषध, झोपेचे औषध आणि निराशाविरोधी औषध देण्याच्या प्रवृत्तीत वाढ झाल्याने ते खूपच चिंतीत आहेत.