पॅरालम्पिक चॅम्पियननं जिंकलं होतं जग, आता इच्छा मरणानं केला आयुष्याचा END

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बेल्जियमची चॅम्पियन पॅरालम्पिअन मरीकी वरवूर्ट ने मंगळवारी 40 वय असताना इच्छा मृत्यूच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा अंत केला. बेल्जीयममध्ये इच्छा मृत्यूला परवानगी आहे. 2016 नंतरच्या रियो खेळानंतर या खेळाडूने जर मी आजारातून बरी झाली नाही तर इच्छा मरणाचा स्वीकार करेल असे ठरवले होते.

मरीकी यांनी सांगितले होते की, केवळ खेळामुळे जिवंत होती. मरीकी ने एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की आजराने जास्त त्रास दिल्यास मी इच्छा मरण पत्करणार आहे.

मरीकी मांसपेशींच्या आजाराने ग्रासली होती. ज्यामुळे सतत त्रास होत होता. तिच्या पायांना लकवा झाला होता आणि ती मोठ्या मुश्किलीने झोपत होती. हळू हळू तिचे जीवन नरकाप्रमाणे होऊ लागले होते. मरीकीला वयाच्या चौदाव्या वर्षी या आजाराबाबत समजले त्यानंतर खेळालाच तिने आपले जीवन बनवले. लंडन येथे 2012 मध्ये 100 मीटर मध्ये सुवर्ण आणि 200 मीटर मध्ये रजत पदक पटकावले होते. चार वर्षानंतर रियो खेळामध्ये 400 मीटरमध्ये रजत 100 मीटरमध्ये कांस्य पदक पटकावले होते. तोपर्यंत त्यांची दृष्टी एकदम कमी झालेली नव्हती.

मरीकीने 2008 मध्येच इच्छा मरणाच्या अर्जावर स्वाक्षरी केलेली होती. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या जर इच्छामृत्यू संदर्भातील त्यांची कागदपत्रे तयार नसती तर कदाचित त्यांनी या आधीच आत्महत्या केली असती. कारण एवढ्या त्रासात जगणे खूप कठीण असते.

Visit : Policenama.com