Param Bir Singh | परमबीर सिंग यांच्याविरूध्द आणखी एका पोलिस निरीक्षकाची गंभीर तक्रार ! होणार खुली चौकशी?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Param Bir Singh | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांना ॲंटिलिया स्फोटक प्रकरणात अटक करण्याची शक्यता असतानाच आता आणखी एका प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (anti corruption bureau, maharashtra) खुली चौकशी करण्याची तयारी सुरू केली आहे. पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे (Police Inspector B.R. Ghadge) यांनी केलेल्या तक्रारीच्या खुल्या चौकशीस राज्य सरकारने परवानागी दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पोलीस निरीक्षक अनुप डांगे (Police Inspector Anup Dange) यांनी केलेल्या तक्रारीवरून आधीच लाच लुचपत विभागाकडून परमबीर सिंग यांची चौकशी सुरू आहे. या तक्रारीत सेवेत पुन्हा घेण्यासाठी सिंग यांनी निलंबित डांगे यांच्याकडे दोन कोटींची मागणी केल्याचे म्हंटले आहे. याप्रकरणाची खुली चौकशी सुरू असतानाच पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांना पत्र लिहून भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी मागणी केली होती.

या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सरकारने लाचलुचपत विभागाला या प्रकरणाची खुली चौकशी करण्यास हिरवा कंदील दिला आहे. परमबीर यांच्याविरोधात घाडगे यांच्या तक्रारीवरून कट रचणे, पुरावे नष्ट करणे, आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील वाचा

Pravin Darekar | ‘त्या’ वक्तव्यावरुन प्रविण दरेकर यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

Mumbai High Court | वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Param Bir Singh | acb gets nod to launch second inquiry against param bir singh police inspector B.R. Ghadge give complaint

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update