Param Bir Singh | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याबाबत सस्पेन्स कायम ! क्राइम ब्रँचनं उचललं ‘हे’ पाऊल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  Param Bir Singh | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्याशी संबंधीत प्रकरण पुढे नेत आता त्यांना क्राइम ब्रँचने चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. क्राइम ब्रँचने त्यांना 12 ऑक्टोबरसाठी नोटीस पाठवली आहे.

मुंबईतील घरावर चिकटवली नोटीस

गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह, सचिन वाझे आणि इतर लोकांवर खंडणीचे प्रकरण दाखल करण्यात आले होते.
ज्याचा तपास मुंबई क्राइम ब्रँचकडे सोपवण्यात आला होता. आता परमबीर सिंह यांच्या मुंबई निवास्थानावर क्राइम ब्रँचने
(Mumbai Police Crime Branch) नोटीस चिकटवली आहे तर आणखी एक टीम हरियाणामध्ये नोटीस देण्यासाठी गेली आहे.

भारतातून पळाले परमबीर सिंह

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांच्याशी संबंधीत प्रकरणाचा तपास करत असलेल्या एजन्सीज आणि लोकांना वाटते की,
ते भारतातून पळाले आहेत. परमबीर सिंह 7 एप्रिलला राष्ट्रीय तपास संस्थेसमोर हजर झाले होते. त्यांना अँटेलिया स्फोटकांच्या प्रकरणात समन्स जारी करण्यात आले होते.

अँटेलियांनतर 17 मार्चला परमबीर सिंह यांची बदली होम गार्ड डिपार्टमेंटमध्ये करण्यात आली होती.
त्यांनी 22 मार्चला आपला पदभार सांभाळला होता आणि म्हटले जात आहे की, 4 मेपर्यंत ते ऑफिसला आले होते.
यानंतर आरोग्याची कारणे सांगून 5 मेपासून रजेवर गेले. असे सांगण्यात आले होते की, ते आपल्या मुळ गावी चंदीगढमध्ये आहेत.

 

मे आणि ऑगस्टच्या दरम्यान त्यांनी अनेकदा महाराष्ट्र सरकारकडे रजा वाढवण्याची मागणी केली होती.
म्हटले गेले होते की, त्यांची सर्जरी झाली आहे आणि त्यांना विश्रांती घेण्यास सांगण्यात आले आहे.

यानंतर ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात त्यांनी पुन्हा एकदा रजा वाढवण्यास सांगितले आणि 29 ऑगस्टपर्यंत रजेवर गेले.
परंतु यानंतरपासून त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संवाद झालेला नाही. एनआयएच्या अधिकार्‍यांनी सुद्धा त्यांना ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात समन्स पाठवले होते, परंतु ते मिळाले नाही.

 

Web Title : Param bir singh | mumbai crime branch notice to parambir singh 12 october interrogation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! कोविड रूग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टरांना देणार 1.21 लाख रुपये

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा दरमहिना 100 रुपयांची गुंतवणूक, होईल लाखोचा फायदा

Datsun Go | झीरो डाऊन पेमेंटवर 2.1 लाखात खरेदी करा Datsun Go, कंपनी देईल मनी बॅक गॅरंटीसह वॉरंटी प्लान; जाणून घ्या