Param Bir Singh Suspension Orders Revoked | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील आरोप मागे, निलंबन देखील रद्द

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Param Bir Singh Suspension Orders Revoked | महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra State Gove) गृह विभागाने (Maharashtra Home Dept) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त (Mumbai Former CP) परमबीर सिंह (IPS Param Bir Singh) यांच्यावर सर्व आरोप मागे घेत त्यांच्यावर डिसेंबर 2021 मध्ये केलेली निलंबनाची कारवाई देखील रद्द करण्यात आली आहे. त्यांचा निलंबनाचा कालावधी देखी ऑन डयुटी असल्याचं मानलं जावं असं गृह विभागाच्या आदेशात नमुद करण्यात आले आहे. परमबीर सिंह यांनी राष्ट्रवादीचे नेते (NCP Leader) आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रूपयांच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

राज्य सरकारचे संयुक्त सचिव वेंकटेश भट (Joint Secretary Venkatesh Bhat) यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर 100 कोटी रूपयांच्या वसुलीचे आरोप केल्यानंतर त्यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. परमबीर सिंह यांना मुंबई पोलिस आयुक्त पदावरून देखील हटविण्यात आले होते. काही गुन्हे देखील परमबीर सिंह यांच्यावर नोंदविण्यात आले होते.

आता मात्र महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने परमबीर सिंह यांच्यावरील सर्व आरोप मागे घेत त्यांच्यावर
करण्यात आलेली निलंबनाची कारवाई देखील रद्द केलेली आहे.

Web Title :-  Param Bir Singh Suspension Orders Revoked | Big decision of Shinde-Fadnavis government! Charges dropped against former Mumbai Police Commissioner Parambir Singh, suspension cancellation order

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Accident News | पुणे क्राईम अ‍ॅक्सीडेंट न्यूज : कोंढवा पोलिस स्टेशन : कात्रज – कोंढवा रस्त्यावर भीषण अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यु

Uddhav Thackeray On Rahul Narvekar | ‘जर अध्यक्षांनी काही उलट-सुलट केलं तर…’, उद्धव ठाकरेंचा विधानसभा अध्यक्षांना इशारा (व्हिडिओ)