Parambir Singh | परमबीर सिंह मुंबई पोलिसांसमोर हजर ! गुन्हे शाखेकडून 7 तास चौकशी, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा गंभीर आरोप केलेले आणि फरार घोषित करण्यात आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आज मुंबई पोलिसांपुढे (Mumbai Police) हजर झाले. गोरेगाव येथे दाखल करण्यात आलेल्या खंडणी प्रकरणाच्या (ransom case) तपासासंदर्भात तपास यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी परमबीर सिंह (Parambir Singh) आज थेट कांदिवलीमधील गुन्हे शाखेच्या कक्ष 11 (Kandivali Crime Branch) मध्ये हजर झाले. त्यांची तब्बल 7 तास चौकशी झाली असून त्यांनी सर्व आरोप फेटाळल्याची (all allegations denied) माहिती समोर येत आहे.

दरम्यान, परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती बुधवारी समोर आली होती. आपण देशातच असून जीवाला धोका असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अटकेपासून संरक्षण दिल्यास दोन दिवसांत चौकशीला हजर राहू, असे परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी कोर्टात वकिलांमार्फत स्पष्ट केले होते. त्यानुसार कोर्टाने त्यांना अटकेपासून संरक्षण दिले होते.

कोर्टाच्या निर्णयानंतर परमबीर सिंह आज मुंबईत दाखल झाले आहेत.
त्यांच्याविरोधात मुंबई व ठाणे येथे सहा गुन्हे (FIR) दाखल आहेत.
आपल्याविरोधात मुंबईत सुरु असलेल्या सीबीआय (CBI) चौकशीला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. आता परमबीर सिंह परतल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे.

 

Web Title :- parambir singh | 7 hours interrogations parambir singh all allegations denied mumbai police crime branch

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Corporation | बकेट, कापडी पिशव्या, बेचेंस खरेदीला शहर कॉंग्रेसकडून विरोध; महापालिकेतील ‘कॉंग्रेस’ची झाली ‘गोची’

Pimpri Corona | पिंपरी चिंचवड शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 61 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांना ‘या’ गुंतवणुकीवर मिळेल 6 पट रिटर्न, येणार आहे कंपनीचा IPO