Parambir Singh Absconding | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह तिघांना कोर्टानं केलं फरार घोषित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Parambir Singh | राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात 100 कोटी रूपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) हे गेल्या अनेक दिवसापासून बेपत्ता आहेत. यामुळे अखेर मुंबईतील किला न्यायालयाने (Mumbai Court) परमबीर यांना फरार (Absconding) घोषित केले आहे. त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणीत आता भर पडली आहे.

परमबीर सिंग (Parambir Singh) हे मागील अनेक दिवसापासून गायब आहेत. अनेक समन्य बजावून देखील ते हजर राहिले नाहीत. परमबीर यांच्याविरोधात लूक आऊट नोटीस (Lookout Notice) जारी होईल अशी शक्यता होती. पण त्याआधीच खंडणी प्रकरणात परमबीर सिंग यांना मुंबई किला न्यायालयाने (Mumbi Court) फरार घोषित केले आहे.

दरम्यान, परमबीर सिंग यांना बुधवारी न्यायालयाने फरार घोषित केले आहे. गुन्हे शाखेचा (Mumbai Police Crime Branch) अर्ज मंजूर करत न्यायालयाने परमबीर सिंगला फरार घोषित केले. दरम्यान, सिंग खंडणी प्रकरणात राज्य सरकारने SIT स्थापन केली होती. या समितीने केलेल्या चौकशी दरम्यान पुरावे आढळून आले होते. त्यानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) २ पोलीस निरीक्षकांना (Police Inspector) अटक होती. नंदकुमार गोपाले (Nandkumar Gopale) आणि आशा कोरके (Asha Korke) अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नाव आहेत. या दोघांनीही गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले होते, तर परमबीर सिंग यांच्या सांगण्यावरुन पैशांचा व्यवहार झाला होता.

याच प्रकरणी रियाज भाटी (riyaz bhati) आणि विनय सिंग (vinay singh) यांना देखील न्यायालयानं फरार घोषित केलं आहे.
मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांना फरार घोषित करण्याची ही किंबहुना पहिलीच वेळ असल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Web Title :- Parambir Singh Absconding | former mumbai police commissioner parambir singh finally declared absconding

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Hardik Pandya | ‘हार्दिक पांड्या म्हणजे क्रिकेटची ‘कंगना रणौत…’; वादावर चाहते भडकले

Sharad Pawar | शरद पवारांकडून नवाब मलिक यांची पाठराखण; म्हणाले…

Parineeti Chopra | पिवळ्या रंगाच्या मोनोकनीमध्ये परिणीती चोप्राने शेअर केला फोटो, म्हणाली…