Parambir Singh | आज होणारी परमबीर सिंह यांची चौकशी टळली; ACB ने दिला ‘वेळ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Parambir Singh | मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून (anti corruption bureau maharashtra) समन्स बजावण्यात (ACB Summons) आलं होतं. त्या नोटीसनूसार आज (मंगळवारी) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, परमबीर सिंह यांनी कोरोनाचे (coronavirus) कारण सांगत दोन आठवड्यांचा वेळ मागून घेतला आहे. त्यामुळे आज होणारी परमबीर सिंह यांची चौकशी टळली आहे.

 

अनुप डांगे (Anup Dange) प्रकरणात परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांची आज (मंगळवार) दुपारी 12.30 वाजता जबाब नोंदवण्यात येणार होता. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण सांगत परमबीर सिंह यांनी वकिलांमार्फत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) पत्र व्यवहार करून 2 आठवड्याचा वेळ मागून घेतला आहे. याआधी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 10 जानेवारी रोजी देखील परमबीर यांना नोटीस जारी केली होती. परंतु, 11 जानेवारी रोजी सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी असल्याचं कारण देत परमबीर यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतला होता.

 

Web Title :-  Parambir Singh | after the acb summons mumbai ex CP parambir singh asked for two weeks time

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा