परमबीर सिंग यांनी सरकारवर आरोप केल्याचा फटका इतर पोलिस अधिकार्‍यांना?

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावरून राज्यात गोंधळ निर्माण झाला. यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला. याकारणाने राज्य सरकारची प्रतिमा मालिन झालेली असतानाच राज्य शासनाने परमबीर यांच्या ओळखीतील अधिकाऱ्याकडे आपल्या दृष्टीतुन लक्ष केले. यामुळे आता पोलीस खात्यात बदल्या आदेश निघत आहे. शासनाच्या या आदेशाचा फटका मात्र ठाण्यातील काही अधिकाऱ्याना बसला गेला.

राज्य शासनाच्या बदल्याच्या आदेशामुळे हा फटका अनेक पोलिसांना बसत आहे. मुंबईच्या काही अधिकाऱ्यांचे देखील बदलीचे तात्काळ आदेश काढण्यात आले. मागील आठवडयामध्ये ठाणे पोलीस दलातील क्राईम घटक नंबर एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांची बदली केली. यांच्यापूर्वी ठाण्यातीलच खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्यासह वरिष्ठांकडे गंभीर स्वरूपाच्या तक्रारी आणि वादग्रस्त पार्श्वभूमी असलेले काही अधिकारी सोडून बाकी अधिकाऱ्यांच्या बदलीचा काही हेतू नव्हता. म्हणून या अधिकाऱ्यांनी काही काळासाठी परमबीर सिंग यांच्या बरोबर काम केल्याने त्यांच्या ओळखीतील अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. हीच ओळख त्यांना आता अंगलट आलीय. किंबहुना बदली केलेले काही अधिकारी दीर्घ काळापासून परमबीर सिंग यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये सुद्धा नव्हते. अधिकाऱ्यांची बदली केल्याने परमबीर सिंह यांना काहीच समस्या नसणार आहेत.

या दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी राज्यातच नव्हे तर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही प्रकरणांचा उलगडा त्यांनी या काळात केला. त्यावेळीच परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. आता परमबीर यांच्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याने, सरकारने काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात नितीन ठाकरे यांची बदली नंदुरबार येथे जात पडताळणी समितीमध्ये करण्यात आली आहे. प्रशासकीय वर्तुळात अधिकाऱ्यांच्या बदलीकडे फक्त कारवाई म्हणून नव्हे, तर व्यवस्थेची आवश्यकता म्हणून पहिली जाते.

सरकारी नोकरी म्हटले की, ठराविक काळानंतर बदली आपसूक आलीच. त्यामुळे कधीही बिऱ्हाड हलविण्याची मानसिकता अधिकाऱ्यांची नेहमीच असते. मात्र, परमबीर सिंग यांनी सरकारवर आरोप केल्यानंतर झालेल्या अशाप्रकारच्या बदल्यांमुळे अधिकाऱ्यांच्या सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाझे अथवा हिरेन हत्या घटनेमध्ये तर या अधिकाऱ्यांचा संबंध नाही, अशा संशयाने त्यांच्याकडे बघितले जात आहे. बदलीपेक्षा सामाजिक प्रतिष्ठेची झालेली हानी या अधिकाऱ्यांसाठी अधिक त्रासदायक ठरत आहे. तसेच, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली थेट नंदुरबार येथे आणि तीही पालक शाखेतून काढून जात पडताळणीसारख्या दुय्यम शाखेत केल्यास योग्य संदेश जात नाही. सरकारची ही भूमिका पोलीस दलात नाराजी आणणारी आहे.