Parambir Singh and Sachin Vaze | परमबीर आणि वाझे यांच्यात त्यावेळी केबिनमध्ये तासभर चर्चा; मुंबई पोलिस चौकशी करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Parambir Singh and Sachin Vaze | मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे (Parambir Singh and Sachin Vaze) यांच्यातील बैठकीची चौकशी मुंबई पोलिस (Mumbai Police) करणार आहेत. परमबीर आणि वाझे दोघेही चांदीवाला आयोगासमोर (Chandiwala Commission) हजर झाले होते, या दरम्यान, दोघांची तासभर भेट झाली. दोघे कोणाच्या परवानगीने भेटले? याचा तपास मुंबई पोलिसांकडून होणार आहे.

 

परमबीर सिंह (Parambir Singh) आणि सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी केबिनमध्ये बसून जवळपास तासभर चर्चा केली. अशी माहिती समोर येते. दरम्यान, या भेटीसंदर्भात माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक चांदीवाल आयोगाच्या (Chandiwala Commission) इमारतीत पोहोचले आहे. अशा प्रकारे सिंह आणि वाझे यांना भेटण्याची परवानगी कुणी दिली आणि त्या भेटीत नेमकं काय झालं आहे. याचा तपास आता मुंबई पोलिस करणार आहेत.

दरम्यान, तपासा दरम्यान सचिन वाझेला कारागृहातून आयोगासमोर आणणाऱ्या पथकाची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे.
आज (सोमवारी) परमबीर सिंह यांना चांदीवाला आयोगाने समन्स बजावले होते आणि याच दरम्यान सचिन वाझेला देखील आजच बोलावण्यात आले होते.
तर, सचिन वाझे आणि परमबीर यांना भेटण्याची परवानगी आयोगाकडून मिळाल्याचा दावा सचिन वाझे यांच्या वकिलाने केलाय.

 

Web Title :- Parambir Singh and Sachin Vaze | once upon a time hour long discussion between parambir singh and sachin waze now mumbai police will investigate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Cabinet Decision | महानगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

Pune Corporation | प्रभाग रचनेचा कच्चा आराखडाच अद्याप अपूर्ण ! आराखडा सादर करण्यास मुदतवाढ?

Pension Scheme SWP | करोडपती बनण्याचा हिट फॉर्म्युला ! 100 रुपये वाचवा आणि मिळवा 35,000 मासिक पेन्शन, येथे जाणून घ्या कॅलक्युलेशन

Coronavirus | दक्षिण अफ्रिकेवरून आलेल्या डोंबविलीकराच्या कुटुंबातील 7 जणांचा कोरोना रिपोर्ट आला समोर

Aurangabad Crime | धक्कादायक ! वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून 40 वर्षीय तलाठ्याची आत्महत्या; सुसाईड करण्यापुर्वी लिहिली चिठ्ठी

Modi Government | ‘हा’ बिझनेस सुरू करण्यासाठी सरकार देतंय 2.50 लाख रुपये; पहिल्याच दिवसापासून होईल मोठी कमाई, जाणून घ्या कशी

TV खरेदीसाठी जाताय का? ‘या’ 5 गोष्टी आवश्य पाहून घ्या, अन्यथा नंतर वाढू शकते चिंता!