Parambir Singh | परमबीर सिंग बेल्जियममध्ये आहेत, काँग्रेस नेत्याचा दावा; केली ‘ही’ मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) हे सध्या बेल्जियममध्ये (Belgium) आहेत, असा दावा काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केला आहे. यासोबत निरुपम यांनी परमबीर सिंग (Parambir Singh) यांना पळून जाण्यास कोणी मदत केली? असा सवालही केला आहे. परमबीर सिंग गेल्या अनेक महिन्यांपासून बेपत्ता आहेत. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीजचे (NIA) परमबीर सिंग यांना अनेकवेळा चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, ते अद्याप हजर झाले नाहीत.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त (Former Mumbai Police CP) परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांच्याविरोधात देखील आरोप झाले. त्यावरुन ठाणे कोर्टात (Thane court) देखील परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) जाहीर केले होते.

काँग्रेस नेते (Congress leader) संजय निरुपम यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले की, हे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत. मंत्र्यावर खंडणी वसूलीचा आरोप होता.
तो स्वत: पाच गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड आहे. ते फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
आता ते बेल्जियममध्ये आहेत असे समजते. ते बेल्जियमला गेले कसे?
त्याला सेफ पॅसेज कोणी दिला? आपण अंडरकव्हर पाठवून त्यांना आणू शकत नाहीत?

परमबीर सिंग हे प्रकृतीच्या कारणास्तव मे महिन्यापासून रजेवर आहेत.
परमबीर सिंग यांना त्यांच्या चंदीगड (Chandigarh) येथील निवासस्थानी अनेक पत्र पाठवण्यात आली होती
आणि त्यांचा ठावठिकाणा विषयी विचारणा करण्यात आली होती.
मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही मागील महिन्यात गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil)
यांनी आयपीएस (IPS) अधिकाऱ्यावर कारवाई करण्यासाठी अखिल भारतीय सेवा (आचार) नियमांच्या तरतुदींचा विचार करत असल्याचे सांगितले होते.

हे देखील वाचा

Thackeray Government | ठाकरे सरकारची मोठी घोषणा ! ‘या’ कर्मचार्‍यांना मिळणार दिवाळी भेट

Gold Price | धनत्रयोदशीला खरेदी करा सोने, दिवाळीनंतर 8000 रुपयांनी होऊ शकते महाग!

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Parambir Singh | congress leader sanjay nirupam claim that former mumbai cp parambir singh is in belgium

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update