Parambir Singh | परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  मुंबई माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह (Former Mumbai CP Parambir Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात खंडणीच्या आरोपांप्रकरणी (ransom allegation case) अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) यासंबंधित कोर्टात याचिका दाखल केली आहे. ठाणे कोर्टाने परमबीर सिंह यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट (non bailable warrant) जारी केले आहे.

परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आदेश दिल्याने आरोप करुन खळबळ उडवून दिली होती.
यानंतर परमबीर सिंह बेपत्ता झाले. त्यांच्या लेटर बॉम्बनंतर मुंबई, ठाणेसह इतर शहरांमध्ये खंडणी आणि धमकावल्याचे गुन्हे परमबीर सिंह यांच्यावर दाखल झाले.
या प्रकरणाची मुंबई गुन्हे शाखेचे अधिकारी तपास करत आहे. मात्र, परमबीर सिंह यांचा ठावठिकाणा कोणालाच माहिती नाही आहे.

 

त्यामुळे अखेर मुंबई गुन्हे शाखेने मुंबईच्या किल्ला कोर्टात धाव घेतली.
परमबीर सिंह यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची याचिका दाखल केली होती.

 

Web Title : Parambir Singh | Court issues non bailable warrant against Parambir Singh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Amol Mitkari | ‘भाजपचा पैसा घ्या, पण मतदान महाविकास आघाडीलाच करा’ – अमोल मिटकरी

Aryan Khan Drugs Case | आर्यन खान ड्रग्ज केसमधील NCB चा ‘पंच’ किरण गोसावीला 8 दिवसांची पोलीस कोठडी

ED | अजित पवारांना पुन्हा धक्का ! जगदीश कदम यांच्या निवासस्थानी ED ची धाड