Parambir Singh | …म्हणून परमबीर सिंग यांनी ‘सिक लिव्ह’ वाढवली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी आपल्या आजरापणाची रजा (Sick Liv) वाढवली आहे. त्यामुळे राज्य सरकार त्यांच्या विरोधात करत असलेली चौकशी रेंगाळली आहे. पाठीचा आजार बळावल्याचे कारण देत त्यांनी ही रजा वाढवल्याचे सांगण्यात येत आहे. परमबीर सिंग (Parambir Singh) हे मागील एप्रिलपासून रजेवर आहेत. त्यांनी सिक लिव्ह (sick leave) वाढवल्याने त्यांच्यावरील गंभीर आरोपांची चौकशी प्रलंबित राहिली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)यांनी सचिन वाझेला (Sachin Vaze) दर महिन्याला 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा गौप्यस्फोट केला. या प्रकरणाची सध्या सीबीआय, ईडीकडून चौकशी सुरु आहे. तर परमबीर सिंग यांच्या विरोधात देखील भ्रष्टाचार, खंडणीच्या तक्रारी आल्या आहेत. यापैकी काही प्रकरणात गुन्हे (FIR) दाखल तर काही प्रकणांची सीआयडी व अन्य यंत्रणेमार्फत चौकशी सरु आहे.

परमबीर सिंग एकदाही चौकशीला हजर राहिले नाहीत

परमबीर सिंग यांनी केलेल्या सेवा नियमांचे उल्लंघन व मलबार हिल पोलीस ठाण्याचे (Malabar Hill Police Station) पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांना जाणीपूर्वक दिलेला त्रास आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांसंदर्भात प्राथमिक चौकशी नियोजन विभागाचे अपर सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडे आहे.
त्यांना या प्रकरणाचा अहवाल तात्काळ सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
परंतु परमबीर सिंग हे एकदाही चौकशीला उपस्थित राहिले नाही.
त्यांचा जबाबही पाठवण्यात आलेला नाही. त्यासाठी ते आजारी असल्याचे कारण त्यांनी दिल्याचे सुत्रांकडून समजतेय.

संजय पांडे स्वत:हून चौकशीतून बाहेर

परमबीर सिंग यांची प्राथमिक चौकशी सुरुवातीला अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे देण्यात आली होती.
त्यांनी ती सुरु करण्यापूर्वी परमबीर यांनी ‘कॉल ऑन’ साठी भेट घेतली, त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप कॉल करुन त्यांचे पत्र मागे घेण्याबद्दल वदवून घेतले, ते संभाषण रॉकॉर्ड करुन न्यायालयात सादर करण्यात आले.
त्यामुळे संजय पाडे यांना स्वत:हून चौकशीतून बाहेर पडण्याशिवाय पर्याय उरला नाही.

Web Title : parambir singh extended his sick leave enquiry still pending

हे देखील वाचा

Pankaja Munde | पंकजा मुंडेंच्या समर्थनासाठी गर्दी करणार्‍यांवर आयोजकांसह
43 नेते आणि 120 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Pregnancy Bible | करीना कपूर-खान विरोधात बीडमध्ये पोलिसांत तक्रार दाखल