Parambir Singh | कोर्टानं फरार घोषित केलेले माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग अखेर मुंबईत अवतरले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Parambir Singh | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग हे गायब होते. समन्स बजावून देखील ते हजर राहिले नाहीत. यानंतर परमबीर यांना मुंबई किला न्यायालयाने फरार घोषित केले. यानंतर परमबीर सिंग हे मुंबईत परतले आहेत.

 

न्यायालयाने एकीकडे परमबीर सिंग (Parambir Singh) यांना फरार घोषित केलं आहे. तर दुसरीकडे सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल असलेल्या याचिकेत परमबीर यांच्या वकिलांनी ते फरार नसून देशातच असल्याचा दावा केला होता. तसेच ते लवकरच मुंबईत परतणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. पण त्यांनी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचं सांगत केंद्रीय यंत्रणांनी चौकशी करावी, अशी विनंती परमबीर यांच्या वकिलांनी न्यायालयात केली. सर्वाेच्च न्यायालयाने या प्रकरणी परमबीर यांना अटक (Arrested) न करण्याचे आदेश दिले होते. यानंतर आता परमबीर हे मुंबईत दाखल झाले आहेत.

दरम्यान, गोरेगाव पोलीस ठाणे (Goregaon Police Thane) येथे दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी (extortion case) न्यायालयाने परमबीर सिंग यांना फरार घोषित केलं होतं.
कोर्टाची हीच नोटीस आता परमबीर यांच्या जुहू येथील फ्लॅटच्या दरवाज्यावर लावण्यात आलीय.
संबंधित कारवाई ही न्यायालयाच्या आदेशान्वये करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 6 डिसेंबर रोजी आहे.

 

Web Title :- Parambir Singh | former mumbai cp param bir singh has landed in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

एकविसाव्या शतकाला साजेशी जीवन पद्धतीला अनुसरून सलग्न व समकालीन शिक्षण व्यवस्था

ST Workers Strike | आझाद मैदानावरील एसटी कामगारांचे आंदोलन मागे; विलिनीकरणासाठी लढा सुरु ठेवणार

Retired ACP Shamsher Khan Pathan | ’26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंहांनी अतिरेकी कसाबचा मोबाईल लपवला’; निवृत्त ACP शमशेर खान-पठाण यांचा आरोप

Coronavirus in Maharashtra | राज्यात आज रुग्णांची संख्या कमी पण मृत्यूची संख्या वाढली, गेल्या 24 तासात 1043 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Nagar Panchayat Election | राज्यातील 105 नगरपंचायतींसाठी 21 डिसेंबरला मतदान, आचारसंहिता लागू

Parambir Singh | फरार मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारतातच, ‘या’ ठिकाणी आहेत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त