Parambir Singh । प्रकृती ठीक नसल्याचं कारण देत परमबीर सिंग यांनी मागितला ED कडे वेळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटीच्या खंडणीचे आरोप करणारे मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांची सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) चौकशी सुरु आहे. परंतु परमबीर यांनी चौकशीसाठी ED कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी अजून थोडा अवधी मागितला आहे. परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी आपली प्रकृती ठीक नाही, शस्त्रक्रिया करावी लागणार आहे, याबद्दल कारण देत त्यांनी ED कडे वेळ देण्याची मागणी केली आहे.

ED कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी अजून थोडा अवधी मागणीसाठी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी एका पत्राद्वारे सक्तवसुली संचालनालय (ED) कार्यालयात हे कळवलं आहे. अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्य़ा आरोपाशी संबंध असल्याने परमबीर सिंग यांची देखील ED कडून चौकशी सुरु आहे. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागील काही महिन्यांमध्ये सध्या बरखास्त केलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना अनेकदा त्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या ज्ञानेश्वर बंगल्यावर बोलावलं होतं. त्यावेळी त्यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) यांना फंड जमा करण्यासाठी मदत करण्याचे आदेश दिले होते. जवळपास फेब्रुवारी महिन्यात आणि त्यानंतर सचिन वाझेंना गृहमंत्र्यांनी त्यांच्या घरी बोलावलं होतं. त्यावेळी गृहमंत्र्यांचे पर्सनल सेक्रेटरी पाळंदे आणि अन्य काही कर्मचारीही तिथे उपस्थित होते.

दरम्यान, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना सांगितलं की त्यांना महिन्याला शंभर
कोटी रुपये जमा करण्याचं टार्गेट होतं. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मुंबईत जवळपास 1750 बार,
रेस्टॉरंट आणि अन्य आस्थापनं आहेत. जर त्या प्रत्येकाकडून दोन ते तीन रुपये जमा झाले, तर
महिन्याला 40 ते 50 कोटी जमा होतील. उर्वरित पैसे अन्य मार्गांनी जमा करता येतील, असे गृहमंत्री
देशमुख यांनी सचिन वाझेंना सांगितलं होतं, असा आरोप परमबीर यांनी केला होता. तसेच,
कायदेशीर कारवाईपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी परमबीर (Parambir Singh) यांनी हा
आरोप केला असल्याचं देशमुख यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटलं होतं.

हे देखील वाचा

Bank of Baroda Recruitment 2021 | बँक ऑफ बडोदा मुंबई येथे अधिकारी पदांची भरती, ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी


ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Parambir Singh | former mumbai police commissioner param bir singh has requested some more time to be present at the enforcement directorate

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update