Parambir Singh | ‘बेपत्ता’ परमबीर सिंह आणखी ‘गोत्यात’ ! आता अटकेची टांगती तलवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बुधवारी राज्य सरकारने (Maharashtra Governemnt) उच्च न्यायालयात (High Court) आपली भूमिका स्पष्ट केली. परमबीर सिंह (Parambir Singh) यांचा ठावठिकाणा माहीत नाही. ते बेपत्ता आहेत. त्यामुळे त्यांना अटकेपासून संरक्षण देण्याचे आश्वासन आपण कायम करू शकत नसल्याचे राज्य सरकारने म्हंटले आहे.

बुधवारी परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी त्यांच्यावर दाखल असलेल्या अ‍ॅट्राॅसिटी कायद्याच्या व भारतीय दंड
संहितेच्या काही कलमांतर्गत गुन्हा रद्द करण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात न्या. नितीन जामदार (Justice Nitin Jamdar) व न्या. सारंग कोतवाल (Justice Sarang Kotwal) यांच्या खंडपीठा समोर सुनावणी झाली.
त्यावेळी राज्य सरकारने परमबीर सिंह (Parambir Singh) बेपत्ता झाल्याचे न्यायालयाला सांगितले.
राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करताना अ‍ॅड. डी. खंबाटा (Adv. D. Khambata) म्हणाले की,
आता परिस्थिती बदलली आहे. अ‍ॅट्राॅसिटी कायद्यांतर्गत आरोपी असलेल्या व बेपत्ता झालेल्या आयपीएस अधिकाऱ्याला (IPS Officer) कठोर कारवाईपासून संरक्षण देण्याचे आश्वासन देऊ शकत नाही.
ते बेपत्ता असल्याने राज्य सरकारने आधी दिलेले आश्वासन कायम ठेवू इच्छित नसल्याचे न्यायालयाला सांगितले.

Chandrakant Patil | ‘पेट्रोल-डिझेल स्वस्त न होण्यासाठी अजित पवार जबाबदार’ – चंद्रकांत पाटील (व्हिडीओ)

तर परमबीर सिंह यांचेतर्फे अ‍ॅड महेश जेठमलानी (advocate mahesh jethmalani) यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, परमबीर सिंह बेपत्ता झाले असल्याचे अजून जाहीर करण्यात आले नाही.
या प्रकरणात त्यांना दोनदा समन्स बजावण्यात आले आहे. त्याला त्यांनी दोन्ही वेळेला त्यांनी उत्तर दिले आहे.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या याचिकेवरील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत पुढे ढकलली आहे.

ठाणे (Thane) आणि मुंबईत (Mumbai) परमबीर सिंह यांच्यावर चार खंडणीचे गुन्हे (extortion cases) दाखल करण्यात आले आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केल्यामुळे हे सर्व गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सिंह यांनी या याचिकेत म्हंटले आहे.

अकोला (Akola) येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे (Police Inspector Bhimrao Ghadge) यांनी ठाण्यातील एका प्रकरणात बड्या आरोपींची नावे वगळण्याचे परमबीर सिंह यांचे आदेश नाकारले होते.
त्यावेळी ठाणे पोलीस आयुक्त म्हणून परमबीर सिंह होते.
त्यामुळे सिंह (Parambir Singh) यांनी घाडगे यांना एका प्रकरणात आरोपी केले होते.

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा ‘घट’ तर चांदीच्या दरात ‘वाढ’; जाणून घ्या

रतन टाटा यांच्या TCS ला 7 व्यावसायिक दिवसात झाला 1.41 लाख कोटी रुपयांचा तोटा, गुंतवणुकदारसुद्धा झाले हैराण

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलची चढती ‘कमान’ कायम; जाणून घ्या आजचे दर

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Parambir Singh | former mumbai police commissioner param bir singh not traceable maharashtra government tells in mumbai high court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update