Parambir Singh | माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी निलंबनाचा आदेश धुडकावला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Parambir Singh | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांना काल (गुरुवारी) निलंबन (Suspended) करण्यात आलं. निलंबनाबाबत राज्य सरकारने (Maharashtra Government) आदेश काढत परमबीर यांना एक दणका दिला आहे. परंतु. आज परमबीर सिंह यांनी राज्य सरकारचा निलंबनाचा हा आदेश धुडकावला आहे. ‘ज्येष्ठतेनुसार पोलिस महासंचालकांकडून आलेला हा आदेश आपण स्वीकारणार नसल्याचं परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी परमबीर यांच्या निलंबनाबाबतच्या फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर त्यांच्या निलंबनावर कालच शिक्कामोर्तब करण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव देबाशीष चक्रवर्ती (Debashish Chakraborty) यांनी समितीच्या अहवालात परमबीर (Parambir Singh) यांनी सेवेतील नियमांचे उल्लंघन केल्याचा सिंह यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. तसेच ते सेवेतही रुजू न झाल्याचाही त्यांच्यावर ठपका आहे. तसेच परमबीर सिंह यांच्यावर खडणीचे आणि अ‍ॅट्रोसिटीचे गुन्हेही दाखल आहेत.

‘आपण स्वत: पोलिस महासंचालक श्रेणीतील अधिकारी आहोत. हे लक्षात घेता पोलिस महासंचालक आपल्याला निलंबनाचा आदेश देऊ शकत नाही, असे परमबीर सिंह (Parambir Singh) यांचे म्हणणे आहे. गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव हा आदेश आपल्याला देऊ शकतात, असं परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Secretary Manukumar Srivastav) हे आहेत. सध्या ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे रजेवर आहेत. त्यामुळे ते सध्यातरी परमबीर यांच्या निलंबनाचा आदेश देऊ शकणार नाहीत. अशा स्थितीत आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे बघणे महत्वाचे आहे.

 

Web Title :- Parambir Singh | former mumbai police commissioner parambir singh has refused to accept his suspension order maharashtra government

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | सुरक्षारक्षकाने ज्वेलर्समध्ये शिरुन 12 लाखांचा ऐवज नेला चोरुन; भिंतीला भोक पाडून शिरला दुकानात, पत्नीसह गेला पळून

Alanna Pandey | लग्ना आधीच झाली अनन्या पांडेची बहिण गरोदर, आई बसला धक्का तर वडिल म्हणाले…

EPF Passbook Download | EPF Passbook डाउनलोड करता येत नाही? तर, जाणून घ्या सोपी पद्धत

Farmers Loan | शेतकर्‍यांसाठी खुशखबर ! आता पहिल्यापेक्षा जास्त सहजपणे मिळेल कर्ज, SBI ने Adani Capital सोबत केली भागीदारी

Omicron Covid Variant | ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेले तब्बल 9 प्रवासी बाधित