Parambir Singh | परमबीर सिंग यांना २९ जुलैपर्यंत अटक नाहीच ; राज्य सरकारची उच्च न्यायालयात हमी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी अट्रॉसिटीअंतर्गत दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेतली आहे. त्यावर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी, राज्य सरकारची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दरायुस खंबाटा यांनी परमबीर यांच्यावर कारवाई न करण्याबाबतचा राज्य सरकारचा निर्णय २९ जुलैपर्यंत कायम राहील. असे सांगितले. न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत सुनावणी २८ जुलैपर्यंत तहकूब केली आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे (Police Inspector Bhimrao Ghadge) यांनी अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) व काही पोलीस अधिकार्‍यांविरूध्द अट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर हा गुन्हा ठाणे येथे वर्ग करण्यात आला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी व तत्कालीन गृहमंत्री देशमुख यांचा भ्रष्टाचार निदर्शनास आणणारे पत्र मागे घेण्यासाठी सरकारकडून माझ्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप करत परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर झालेल्या गत वेळच्या सुनावणीत राज्यसरकारने सिंग यांच्या अटकेसाठी मुदतवाढ असल्याचे सांगितले होते. गुरुवारी झालेल्या सुनावणीत पुन्हा एकदा राज्य सरकारचा निर्णय २९ जुलैपर्यंत कायम राहील असे, ज्येष्ठ वकील दरायुस खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले.
रश्मी शुक्ला यांच्यावरही कारवाई नाही

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला (Additional Director General Rashmi Shukla) फोन टॅपिंगप्रकरणी गोत्यात आल्या आहेत. त्यांनीही अटकेपासून दिलासा मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांच्या खंडपीठासमोर राज्यसरकारकडून शुक्लांविरोधात २९ जुलैपर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही, असे सांगण्यात आले आहे. शुक्ला यांच्या याचिकेवरही २८ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Web Title : parambir singh  maharashtra government mumbai high court

हे देखील वाचा

Pune News | ‘आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं, आम्हाला काही नको’,
तुम्ही एकत्र येऊन मार्ग काढा, संजय राऊतांचा पुण्यातील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला

Pune News | पोलीसनामाच्या बातमीचा दणका ! अखेर शिरुरचे नायब तहसीलदार ज्ञानदेव यादव यांच्यावर निलंबनाची कारवाई

EPFO | बदलणार PF खात्याशी संबंधीत नियम, EPF चे पैसे पाहिजेत तर आजच पूर्ण करा ‘हे’ काम

Pimpri Crime News | ‘बजाज’ मधून निम्म्या किंमतीत गाड्यांचे आमिष पडले साडेसात लाखांना; बजाज कंपनीत अधिकारी असल्याचे सांगून दोघा भावांनी घातला व्यावसायिकाला गंडा

Koregaon Bhima Inquiry Commission | कोरेगाव भीमा हिंसाचार आयोग साक्षीसाठी शरद पवार यांना बोलवणार; कोरोनामुळे ठप्प झाले होते कामकाज

Health News | जर तुम्हाला लांब आणि मऊ केस हवे असेल तर आजपासून ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या

Pune Crime News | ‘बेटर हाफ’ वेबसाईटवरून ओखळ झाल्यानंतर लग्नाच्या अमिषाने 28 वर्षीय तरूणीची 9 लाखांची फसवणूक