Parambir Singh | ‘परमबीर सिंग आदित्य ठाकरेंच्या जवळचे, कुठे पळून गेले त्यांना विचारा’, भाजप आमदाराचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना ईडीने (ED) अटक केली आहे. ईडीने अनिल देशमुख यांची चौकशी सुरु असताना त्यांनी माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग (Parambir Singh) कुठे आहेत? असा सवाल केला होता. त्यानंतर परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या फरार प्रकरणाला वेग आला आहे. याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

 

दरम्यान, भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी महाविकास आघाडी सरकारने परमबीर सिंग (Parambir Singh) यांना पळून जाण्यास मदत केली असेल असा दावा केला आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी परमबीर सिंग फरार झाले असून त्यांना देशाबाहेर जाण्यास सांगितले आहे. जे केंद्राच्या मदतीशिवाय ते करु शकणार नाहीत असे म्हटले.

 

त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी, परमबीर सिंग आदित्य ठाकरे यांच्या जवळचे होते ते कुठे पळून गेले त्यांना विचारले पाहिजे असा आरोप केला आहे. नतेश राणे पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी परमबीर सिंग आणि आदित्य ठाकरेंचे संबंध जगजाहीर आहेत, असे म्हटले आहे.

पोलीस आयुक्तालयातील CCTV तपासा
पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमधील (Police Commissioner) सीसीटीव्ही तपासा, तिथले सीडीआर रिपोर्ट तपासा, तिथल्या पोलिसांकडून माहिती घ्या. पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमध्ये सर्वात जास्त वेळ बसणारे मंत्री आदित्य ठाकरे होते. ही माझी माहिती नाही तुम्ही पोलीस आयुक्तांच्या ऑफिसमधील सीसीटीव्ही फुटेज पाहू शकता. परमबीर सिंग त्यांच्या जवळ होते मग त्यांना विचारले पाहिजे ना का पळाले आणि कुठे गेले आहेत? असे नितेश राणे म्हणाले.

 

परमबीर यांच्याकडे महत्त्वाची माहिती
परमबीर सिंग यांच्याकडे फक्त अनिल देशमुख यांचीच माहिती नाही आहे.
सुशांत सिंह राजपूतचे (Sushant Singh Rajput) काय झाले? दिशा सालियानचे (Disha Salian) काय झाले? ही सर्व माहिती देखील परमबीर यांच्याकडे आहे.
दिशा सालियानच्या घराच्या बाहेरील सीसीटीव्ही फुटेज गायब झाले. या सर्व माहितीचा कटोरा परमबीर सिंग यांच्याकडे आहे.
म्हणून परमबीर आणि आदित्य ठाकरे यांचे संबंध जगजाहीर आहेत, असे राणे यांनी सांगितले.

 

तेंव्हा परमबीर सिंग चांगले होते…
नितेश राणे पुढे म्हणाले, जुन्या महापौर बंगल्यावर सगळे तासन् तास बसून असायचे.
तेव्हा परमबीर सिंग चांगले होते क? मग आज का व्हिलन झाले आहेत? तुम्हाला माहिती असेल तर घेऊन या, असेही राणे म्हणाले.

 

Web Title :- Parambir Singh | mumbai former cp parambir singh close to aditya thackeray serious allegations of bjp mla nitesh rane

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | येरवडा कारागृहातून सुटल्यानंतर दुचाकी रॅली काढणं पडलं महागात, गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

Gold Price Today | धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत झाली मोठी घसरण ! आता 28024 रुपयात मिळतेय 1 तोळा, जाणून घ्या 14 ते 24 कॅरेटचा नवीन दर

Uddhav Thackeray | फडणवीसांच्या ‘बॉम्ब’ फोडण्याचा इशारा; मुख्यमंत्र्यांची बारामतीत जोरदार फटकेबाजी