Parambir Singh |’गायब’ झालेल्या परमबीर सिंह यांचा सुगावा लागला, ‘या’ शहरात असल्याची माहिती?, असा सापडला पत्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) हे सध्या गायब झाले आहेत. तपास यंत्रणांच्या सुनावणीसाठी आणि चौकशीसाठी न्यायालयात हजर न राहिल्याने ते फरार झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत राज्य सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगाच्या (Chandiwal Commission) सुनावणीदरम्यान त्यांच्या वकिलाने प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे. पॉवर ऑफ अ‍ॅटर्नीशी (Power of Attorney) संबंधित असल्याने परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या ठावठिकाणाबद्दल सुगावा लागला आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार परमबीर सिंह हे चंदीगडमध्ये (Chandigarh) राहत आहेत.

 

परमबीर सिंह (Mumbai EX Police Commissioner Parambir Singh) यांनी केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपानंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. याबबात निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदावाल (Retired Judge Justice Kailash Uttamchand Chandawal) आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. परमबीर यांना आयोगासमोर हजर राहण्यासाठी वारंवार सांगण्यात आले. परंतु ते हजर झाले नाहीत. त्यामुळे ते कुठे गायब झाले असा प्रश्न पडला होता. परमबीर सिंह (Parambir Singh) हे प्रकृती अस्वास्थ्यचे कारण देत सुनावणीसाठी सतत गैरहजर राहत आहेत.

 

असा सापडला पत्ता

 

सीबीआयने (CBI) केलेल्या तपासातही परबीर सिंह हजर न राहिल्याने ते बेपत्ता झाल्याची चर्चा सुरु झाली.
दरम्यान, त्यांचे वकील चंद्रचूड सिंग (Advocate Chandrachud Singh) यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.
परमबीर सिंग यांनी स्वत: तयार केलेले पॉवर ऑफ अटर्नी या उपक्रमाशी संलग्न आहेत. यावरुन परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याचे सूचित होते.
परबीर सिंग यांनी ही पॉवर ऑफ अटर्नी चंदीगडमध्ये तयार केली आहे. कागदावर पत्ता चंदीगड असा दिला आहे.
यामुळे ते चंदीगडमध्ये असल्याचा संशय बळकट झाला आहे.

 

काय म्हटले पॉवर ऑफ अटर्नी मध्ये

 

परमबीर सिंग यांनी महेश पांचाळ (Mahesh Panchal) यांच्या नावाने पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी ऑफर केली आहे.
त्यांच्याऐवजी महेश पांचाळच सुनावणीसाठी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परमबीर सिंह यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात (affidavit) आयोगासमोर काहीही बोलायचे नसल्याचे लिहिले आहे.
आयोगापुढे कोणत्याही युक्तिवादासाठी त्यांना कोणताही पुरावा किंवा मत द्यायचे नाही किंवा उत्तर द्यायचे नाही.

 

Web Title : Parambir Singh | mumbai former police commissioner parambir singh is in chandigarh?

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

PM Garib Kalyan Yojana | पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये सरकारने दिली आणखी एक मोठी सुविधा; हजारो लोकांना होणार लाभ

Matchbox Price | 14 वर्षानंतर महागणार ‘काडेपेटी’, दुप्पट होतील दर; उत्पादकांनी सांगितले ‘हे’ कारण

Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण