Parambir Singh | काय सांगता ! होय, परमबीर सिंग फरार, जुहूमधील फ्लॅटच्या दरवाज्यावर न्यायालयाची ऑर्डर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Parambir Singh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर शंभर कोटींचे बाॅम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांना काही दिवसांपुर्वी फरार घोषित केलं आहे. मुंबईच्या किला कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान सिंग यांना फरार घोषित करण्यात आलं होतं. तर आता फरार (Absconding) असलेली नोटीस परमबीर यांच्या जुहू (Juhu) येथील फ्लॅटच्या दरवाज्यावर लावण्यात आलीय. संबंधित कारवाई ही कोर्टाच्या आदेशान्वये करण्यात आली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.

 

तर, न्यायालयाने परमबीर (Parambir Singh) यांना फरार घोषित केले असले तरी, सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल असलेल्या याचिकेत परमबीर यांच्या वकिलांनी ते फरार नसून भारतातच असल्याचा दावा केलाय. तर, ते लवकरच मुंबईत परतणार असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती. परंतु, त्यांनी मुंबई पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचं सांगत केंद्रीय यंत्रणांनी चौकशी करावी, अशी विनंती परमबीर यांच्या वकिलांनी सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) केलीय. या प्रकरणी परमबीर सिंग यांना अटक न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

दरम्यान, फरार घोषित केल्यानंतर आपली संपत्ती जप्त होईल, अशी भीती परमबीर (Parambir Singh) यांना वाटली. त्यानंतर त्यांनी सर्वाेच्च न्यायालयात अटपूर्व जामीनासाठी धाव घेतली. त्यांच्या जामिनावर आता 6 डिसेंबरला सुनावणी होणार आहे. एककीडे सर्वाेच्च न्यायालयात (Supreme Court) या प्रकरणी खटला सुरु असताना दुसरीकडे मुंबई पोलिसांची (Mumbai Police) कारवाई सुरु आहे. परमबीर यांच्या घराबाहेर लावलेल्या नोटीसमध्ये 30 दिवसांत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पण ते तरीही हजर राहिले नाहीत तर त्यांची संपत्ती जप्त होऊ शकते.

 

Web Title :- Parambir Singh | mumbai kila court order about param bir singh as absconding pasted outside his flat marathi news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Cryptocurrency | Shih Tzu ने गुंतवणुकदारांना केले मालामाल! केवळ 2 तासात 1000 रुपये झाले रू. 60 लाख

Indian Railways | रेल्वे विभागाचा निर्णय ! ट्रेन रद्द झाल्यास तिकीटाचे पैसे आपोआप तुमच्या खात्यावर जमा होणार; जाणून घ्या

E-Commerce | अमेझॉन, फ्लिपकार्टसह 5 ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका, या महत्वाच्या नियमाचे करत नव्हते पालन

Pune Crime | वाळु व्यावसायिक संतोष जगताप खुन प्रकरण ! महादेव आदलिंगे टोळीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांची ‘मोक्का’ कारवाई

Satara District Bank Election | सातार्‍यात महाविकास आघाडीला जबरदस्त धक्का ! गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, शशिकांत शिंदे पराभूत; राष्ट्रवादीच्या आमदाराचा 1 मतानं केला ‘घात’