Parambir Singh | परमबीर सिंहांच्या अडचणीत आणखी वाढ; वसुली प्रकरणात दाऊदचा निकटवर्तीय छोटा शकीलची एंन्ट्री?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – मुंबई-ठाण्याचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या अडचणीत वारंवार वाढ होताना दिसत आहे. परमबीर यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर केलेल्या शंभर कोटी वसुलीच्या आरोपावरून राज्यात राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यापासून या प्रकरणावरून वेगळं वळण लागत गेलं आहे. परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात आतापर्यंत तीन गुन्हे दाखल करण्यात आली आहे. परमबीर आणि 5 पोलीस अधिकाऱ्यांवर सुरु असलेल्या वसुली प्रकरणात आता दाऊदचा साथीदार असलेला छोटा शकीलची (chota shakeel) एंन्ट्री झाली असल्याचं समोर आलं आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

या प्रकरणामध्ये तक्रार दाखल करणाऱ्या श्यामसुंदर अग्रवालने सांगितलं आहे की, त्याला एका खोट्या प्रकरणात अडकवण्यात आलं आणि त्याच्यावर मोक्का लावण्यात आला. आपल्याला आणि कुटुंबियांना धमकावून वसुली करण्यात आली, असा आरोप श्यामसुंदर अग्रवालनं (Shyamsunder Agarwal) केलाय. एका फोन रेकॉर्डिंग वरून माहिती समोर आली आहे की, ज्यामध्ये एक व्यक्ती बिल्डर संजय पुनमिया (Builder Sanjay Punmiya) याला फोन करून धमकी देत असल्याचं ऐकू येतंय. तर, श्यामसुंदर अग्रवालबरोबरचा मुद्दा त्यानं मिटवला नाही तर त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. असं एका वृत्तानुसार माहिती समोर आलीय. दम्यान, हा फोन अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय छोटा शकीलनं (Chhota Shakeel) केला होता. तर आपल्याला फसवण्यासाठी छोटा शकीलने आपले नाव घेतल्याची तक्रार शामसुंदर दासने केलीय. असं पोलसांनी सांगितलं आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

छोटा शकील याने या ऑडिओमध्ये संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला धमकी दिल्याचे ऐकू येत आहे. हा फोन ज्या नंबरवरुन आला होता, तो नंबर पोलिसांच्या क्राईम डाटानुसार छोटा शकीलचा (Chhota Shakeel) असल्यामुळे 2016 सालच्या या ऑडिओ प्रकरणात शामसुंदर अग्रवालवर 17 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा नोंद करुन त्याला मोक्का लावला होता. असं पोलिसांच्या सूत्रानुसार माहिती समजते.

दरम्यान, मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये (Marine Drive Police Station) श्यामसुंदर
अग्रवाल याच्या तक्रारीवरुन परमबीर (Parambir Singh) आणि अन्य पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
तर संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरूय.
तसेच, परमबीर 2015 ते 2018 या कालावधीत बदलीनंतर जे घर वापरत होते, त्याबाबतही त्यांना 24 लाखांचा दंडही आकारण्यात आला आहे.

Web Tital : Parambir singh mumbai police extortion case linked with dawood and chhota shakeel

PM Kisan | खुशखबर! 12.11 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात येणार आहेत 2000 रुपये, चेक करा कधी येणार पैसे?

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले, चांदी 372 रुपयांनी झाली ‘स्वस्त’, खरेदीपूर्वी पहा नवीन भाव

PF Account | पीएफ खातेधारकांसाठी खुशखबर ! या पध्दतीनं मिळेल एक लाख रुपयांचा लाभ, जाणून घ्या सोपी पद्धत