Parambir Singh | अखेर परमबीर सिंग ‘अवतरले’, अनिल देशमुखांबद्दल केला ‘हा’ मोठा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर 100 कोटी वसुली प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस (Mumbai Police) आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) हे मागील काही दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. मात्र आता परमबीर सिंग (Parambir Singh) हे अचानक प्रकटले आहेत. अनिल देशमुखांविरोधात आता आपल्याजवळ देण्यासारखे काहीही पुरावे शिल्लक नाहीत, असा खुलासा परमबीर सिंग यांनी केला आहे.

 

100 कोटी वसुली प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदीवाल (Kailash Uttamchand Chandiwal) यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली आहे.
या समितीकडून परमबीर सिंग (Parambir Singh) यांची चौकशी सुरु आहे. मात्र, आतापर्यंत एकदाही परमबीर सिंग हे चौकशीला हजर झाले नाहीत.
अखेर आता त्यांनी चांदिवाल आयोगापुढे (Chandiwal Commission) प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर केले आहे.

 

अनिल देशमुख यांच्यावर मी जे काही आरोप केले होते, आता त्यांच्याविरोधात कोणतेही पुरावे आपल्याकडे शिल्लक नाही, असा खुलासा परमबीर सिंग यांनी केला आहे.
सिंग यांनी 13 तारखेलाच हे प्रतिज्ञापत्र सादर केले होते.
अनिल देशमुख यांना अटक आणि कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले परमबीर सिंग हे सीबीआयने (CBI) केलेल्या तपासातही हजर राहिले नाहीत.
त्यामुळे ते बेपत्ता झाल्याची चर्चा होती. दरम्यान, त्यांचे वकील चंद्रचूड सिंग (Chandrachud Singh) यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.
परमबीर सिंग यांनी स्वत: तयार केलेले पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी या उपक्रमाशी संलग्न आहेत. यावरुन परमबीर हे चंदीगडमध्ये असल्याचे सूचित होते.

 

Web Title : Parambir Singh | no evidence against former home minister anil deshmukh affidavit of former mumbai cp parambir singh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Modi Government | मोदी सरकारकडून सर्वसामान्यांना दिवाळी भेट ! इंधनावरील टॅक्स घटवला, पेट्रोल 5 रूपयांनी तर डिझेल 10 रूपयांनी ‘स्वस्त’

Pune Crime | पोलिस कर्मचार्‍याकडून शारीरिक व मानसिक त्रास ! WhatsApp व्दारे सुसाईट नोट पाठवून महिला पोलिसाची आत्महत्या, प्रचंड खळबळ

Multibagger Stock | 58 रुपयाचा शेयर 345 रु.चा झाला, केवळ 11 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल, तुमच्याकडे आहे का?